शर्लिन चोप्रा कडून स्टार्सच्या पत्नींवर गंभीर आरोप, म्हणाली, वॉशरुममध्ये…
मुंबई,
प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या एनसीबीच्या कोठडीत आहे. आर्यन खानसह 8 जणांवर ड्रग्जचे सेवन आणि व्यवहार केल्याचा आरोप आहे. शाहरुख खानच्या मुलाचे ड्रग्स प्रकरणात नाव आल्यापासून त्याला बॉलिवूड स्टार्सकडून खुले समर्थन मिळत आहे. यासोबतच अनेक स्टार्सनीही आर्यन खानबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.
या सगळ्या दरम्यान अभिनेत्री शर्लिन चोप्राने शाहरुख खान बद्दल मोठा दावा केला आहे. शर्लिन चोप्रा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ व्यतिरिक्त अनेकदा तिच्या वक्तृत्वामुळे चर्चेत असते. ती अनेक बाबींवर आपले मोकळे मतही ठेवते. आता तिने शाहरुख खानच्या आयपीएल टीम केकेआरच्या एका पार्टीबद्दल आश्चर्यकारक दावा केला आहे.
शर्लिन चोप्राने तिच्या एका जुन्या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये ती शाहरुख खानच्या टीम केकेआरच्या पार्टीचा उल्लेख करताना दिसत आहे. शर्लिन चोप्राने तिच्या अधिकृत इन्स्टाग-ाम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी आपल्या टिवटमध्ये लिहिले, ’शाहरुखच्या केकेआर पार्टीबद्दल, मी ही मुलाखत गेल्या वर्षी दिली होती. या व्हिडीओ क्लिपमध्ये शर्लिन चोप्रा पार्टीबद्दल बोलत असताना म्हणते, ’जेव्हा मी नाचताना थकले आणि घाम येऊ लागला, तेव्हा मी वॉशरूममध्ये गेले आणि वॉशरूमचा दरवाजा उघडला. जेव्हा मी दार उघडले तेव्हा मी जे पाहिले त्याने मला धक्का बसले. मी विचारात पडले. मी विचार केला की मी चुकीच्या ठिकाणी पोहोचले आहे का? पण मी तिथे होते. तिथे स्टार्सच्या बायका आरशासमोर उभ्या होत्या आणि पांढरी पावडर घेत होत्या