’कॉडींर्या द क्रूझ’चा सीईओ जुर्गन बेलोमला एनसीबीने बजावला दुसर्‍यांदा समन्स!

मुंबई,

मुंबईहून गोव्याला जाणार्‍या क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर शनिवारी रात्री एनसीबीने छापा टाकला. यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आतापर्यत अकरा जणांना अटक झाली आहे. आर्यन खानला न्यायालयाने 7 ऑॅक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीने कॉडींर्या द क्रूझवर केलेल्या चौकशीनंतर क्रूझचा सीईओला चौकशीसाठी आज दुसरे समन्स बजावण्यात आले आहे.

कॉडींर्या द क्रूझची एनसीबीकडून सखोल चौकशी-

मुंबईहून गोव्याकडे जाणार्‍या कॉडींर्या द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत तीन महिलांसह एकूण 11 जणांना ताब्यात घेण्यात आले. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. त्यानंतर, रविवारी आर्यन खानसह अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना काला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने 7 ऑॅक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. मात्र, या प्रकरणात एनसीबीने पुन्हा काल कॉडींर्या द क्रूझवर छापा टाकला होता. क्रूझवरून ताब्यात घेतलेल्या 8 जणांची चौकशी केल्यानंतर एनसीबीने तीन आरोपींना अटक केली आहे. सोमवारी केलेल्या कारवाईत आणखी काही जण क्रूझवर ड्रग्स घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एनसीबीने कॉडींर्या द क्रूझचे सीईओ जुर्गन बेलोम यांना पुन्हा समन्स बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. या चौकशीत आणखी नवीन खुलासे होण्याची शक्यत आहे.

पार्टीचा संपूर्ण तपशील एनसीबीने मागितला –

मिळालेल्या माहितीनुसार, कॉडींर्या द क्रूझवर संबंधित अधिकार्‍यांकडून ज्या दिवशी छापा टाकला, त्या दिवशीचा मेनिफेस्टो मागवला आहे. यातून क्रूझवर येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण तपशील, रूम नंबर, त्यांच्या आय-कार्डचा तपशील, मोबाईल क्रमांकासह इतरही माहिती उपलब्ध होईल. क्रूझचे सर्व सीसीटीव्ही फुटेजही अधिकार्‍यांकडून मागवण्यात आले आहेत. याशिवाय या क्रूझवर ड्रग्ज डीलर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे कॉडींर्या द क्रूझवर 2 ऑॅक्टोबर झालेल्या पार्टीचा संपूर्ण तपशील एनसीबीने मागितला आहे. याशिवाय क्रूझचे सीईओ जुर्गन बेलोम यांना पुन्हा समन बजावत चौकशीसाठी बोलावले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!