शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड पोहोचल्या शाळेत, विद्यार्थ्यांचं केलं स्वागत
मुंबई,
तब्बल दीड वर्षानंतर आज राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. ग-ामीण भागासह मुंबईतल्या शाळाही सुरु झाल्यात. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच स्वागत केलं. सायन येथील डी. एस. स्कुल या शाळेला आज सकाळी भेट दिली. ञ्च्इरलज्ञढेडलहेेश्र अंतर्गत शाळेत हजेरी लावलेल्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. पहिल्या दिवसाच्या भावना जाणून घेतल्या.
राज्यभरातील शाळांत शारीरिक अंतर राखून वर्ग भरवले जात आहेत, यावर शाळा व्यवस्थापन कमिटी सातत्याने लक्ष ठेऊन आहे.
आजपासून ग-ामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. तर, शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र, शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला असला, तरीही मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणे महत्त्वाचे आहे.
मुंबईतल्या शाळेत अशी असेल नियमावली
एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल.
शाळा प्रवेशासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल.
सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील तर एक दिवस आड शाळा भरेल.
शाळेत एका दिवशी 15 ते 20 विद्यार्थ्यांनाच प्रवेश असेल.
शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असेल.
मास्क घालणं अनिवार्य असेल.
शाळेत सॅनिटायजरचा वापर करणंही गरजेचं आहे.