समुद्रातील सर्वात मोठा वाहतुकदार असलेल्या एससीआयने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ’वाहतुकीद्वारे परिवर्तन’ हे स्वप्न साकारण्यासाठी भरीव योगदान दिले आहे- केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल
मुंबई,
देशाच्या प्रगतीत शिपिंग कॉर्पोरेशन ऑॅफ इंडिया महत्वाची भूमिका बजावत आहे.मुंबई हे देशाचे अतिशय महत्वाचे केंद्र असून भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाते.आपण हीरक महोत्सव मुंबईत साजरा करत आहोत आणि एससीआय ने आपल्या स्वत:च्या संसाधनांचा उपयोग करत हा हिरक महोत्सवी कार्यक्रम आयोजित केला आहे हे उल्लेखनीय आहे., असे प्रतिपादन केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग खात्याचे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले. शिपींग कॉर्पोरेशन ऑॅफ इंडियाच्या हिरक महोत्सवाचा काल सांगता सोहळा संपन्न झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बंदरे, नौवहन आणि राज्यमंत्री शांतनू ठाकूर, खासदार मनोज कोटक, शिपींग कॉर्पोरेशन ऑॅफ इंडियाच्या अध्यक्ष श्रीमती एच.के.जोशी, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांची उपस्थिती होती.
भारताला नौवहन क्षेत्रातील जागतिक केंद्र बनवण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. त्यानूसारच पंतप्रधानांनी घालून दिलेले 2022 पर्यंत 400 अब्ज अमेरिकी डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य साध्य करणार असल्याचे सर्वानंद सोनोवाल म्हणाले. यासाठी टीम इंडिया या भावनेने आपल्याला काम करायचे आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवत देशाला प्रगतीच्या मार्गावरून पुढे न्यायचे आहे असे त्यांनी सांगितले.सोनोवाल पुढे म्हणाले की समुद्रातील सर्वात मोठा वाहतुकदार असलेल्या एससीआयने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ’वाहतुकीद्वारे परिवर्तन’ हे स्वप्न साकारण्यासाठी भरीव योगदान दिले आहे. आपल्या 60 वर्षाच्या कालखंडात, आपल्या योगदानाद्वारे यशाचे प्रतिक ठरल्याबद्दल मंत्र्यांनी एससीआयची प्रशंसा केली. भारतातल्या महिला आगेकूच करत आहेत.महिला सबलीकरणा साठी सरकारने उचललेल्या पावलाबद्दल धन्यवाद. येत्या काळात अधिक महिला या चळवळीत सहभागी होतील असा मला विश्वास आहे, असे याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले.
संसाधन म्हणून सागराच्या सामर्थ्याची जाणीव आपण जनतेला करून द्यायला हवी. सागरी क्षेत्राच्या क्षमतांची जाणीव करून देत, योग्य तंत्रज्ञानाचा वापर करत त्याचा योग्य मार्गाने वापर कार्याला हवा असे सोनोवाल यांनी सांगितले. सागरी क्षेत्रात आपण आणखी अनेक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. या क्षेत्रात एससीआयने अधिक उपक्रम हाती घ्यावेत आणि जनतेमध्ये या क्षेत्राच्या क्षमतेबाबत आणखी जागृती निर्माण करावी असे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री शंतनू ठाकूर याप्रसंगी बोलताना म्हणाले, 2030 पर्यंत जगात नौवहन क्षेत्राला सर्वात उंचीवर नेण्याचे पंतप्रधांचे व्हिजन आहे. देशातील प्रमुख बंदरांचा विकास करणे. बंदरांना आंतरराष्ट्रीय नकाशावर आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. नौवहन क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत. त्यासाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येईल. देशांतर्गत जलमार्ग हा पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या क्षेत्राला चालना मिळाल्यास कमी खर्चात मालवाहतूक सुविधा पोहचवणे सुलभ होईल.
एससीआयच्या माध्यमातून जागतिक अर्थव्यवस्थेत भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शिपींग कॉर्पोरेशन ऑॅफ इंडियाला सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे शंतून ठाकूर म्हणाले.
शिपींग कॉर्पोरेशन ऑॅफ इंडियाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एम टी स्वर्ण-कृष्णा हे जहाज पूर्णपणे महिला चमूद्वारे संचलित केले. या चमूचा केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आर्थिक अडचणी असतानाही शिपींग कॉर्पोरेशन ऑॅफ इंडियाने नवोन्मेषी उपाययोजनांच्या माध्यमातून सागरी क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केल्याचे शिपींग कॉर्पोरेशन ऑॅफ इंडियाच्या अध्यक्ष श्रीमती एच के जोशी म्हणाल्या.
कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते शिपींग कॉर्पोरेशन ऑॅफ इंडियाच्या सहा दशकांच्या कार्याचा आढावा घेणारे कॉफी टेबल बुक प्रकाशिक करण्यात आले. तसेच कांडला बंदराहून निर्यात जहाज एम व्ही एससीआय चेन्नईला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. शिपींग कॉर्पोरेशन ऑॅफ इंडियाचे संचालक (बल्क कॅरिअर आणि टँकर) अतुल उबाळे यांनी आभारप्रदर्शन केले.
2 ऑॅक्टोबर 1961 रोजी स्थापन करण्यात आलेली शिपींग कॉर्पोरेशन ऑॅफ इंडिया आज सर्वात मोठी भारतीय नौवहन कंपनी आहे. 2008 मध्ये सरकारने शिपींग कॉर्पोरेशन ऑॅफ इंडियाला फनवरत्न: दर्जा प्रदान केला.