या पाच कारणांमुळे आर्यन खानच्या एनसीबी कोठडीत वाढ

मुंबई,

ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह तिघांची एनसीबी कोठडी वाढविण्यात आली आहे. न्यायालयाने या तिघांना सात ऑॅक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत पाठविले आहे. त्यांची एनसीबी कोठडी का वाढविण्यात आली, पाहुया याची काही कारणे..

1) आंतरराष्ट्रीय लिंक्स

एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद करताना आरोपींची 11 ऑॅक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी केली होती. या प्रकरणी व्हॉटसअ‍ॅप चॅटमधून यात आंतरराष्ट्रीय लिंक्स असल्याचे दिसून येत आहे असे त्यांनी कोर्टात सांगितले होते. या लिंकचा उलगडा करण्यासाठी यासंबंधीच्या आर्थिक व्यवहारांच्या लिंक्स उघडकीस आणण्यासाठी कोठडीची मागणी त्यांनी केली होती.

2) बॉलीवूडमधील ड्रग्स कनेक्शन

बॉलीवूडवर सातत्याने ड्रग्स कनेक्शनचे आरोप केले जातात. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हे अधिक ठळकपणे समोर आले. त्यामुळे बॉलीवूडमधील ड्रग्स कनेक्शनविषयीची माहितीही त्यांच्या चौकशीतून मिळू शकते.

3) हायप्रोफाईल नावे

या केसमध्ये सापडलेली बहुतेक सर्वच नावे हायप्रोफाईल आहेत. त्यामुळे यात आणखी काही उच्चभ-ूंचेही कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्या दृष्टीनेही या सर्वांची चौकशी महत्वाची ठरणार आहे.

4) अमली पदार्थांचे वाढते रॅकेट

देशातील युवा पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अलिकडेच गुजरातमधील एका बंदरावरून सुमारे 21 हजार कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते. त्यामुळे अमली पदार्थांचे रॅकेट उध्वस्त करण्याच्या दृष्टीने या सर्वांच्या चौकशीतून समोर येणारी माहिती महत्वाची ठरणार आहे.

5) नशामुक्त समाज

नशामुक्त समाज हे आमचे ध्येय आहे. आम्ही निष्पक्षपणे वागत आहोत. प्रक्रियेत, जर बॉलिवूड किंवा श्रीमंत लोकांशी काही संबंध उदयास आले, तर ते असू द्या. आम्हाला कायद्याच्या कक्षेत काम करावे लागेल असे एनसीबीचे अधिकारी माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. त्यामुळे ड्रग्सविरोधी कारवाईत आणखी माहिती मिळविण्यासाठी त्यांची चौकशी महत्वाची ठरणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!