भावना गवळी ईडी कार्यालयात आल्याच नाही, मागितली 15 दिवसांची मुदत!
मुंबई,
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतही गवळी या हजर झाल्या नाही. त्यांनी ईडीकडे आणखी 15 दिवसांची मुदत मागितली आहे.
वाशिमर्यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्यावर भ-ष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ईडीने धडक कारवाई केली होती. भावना गवळींशी संबंधी सईग खानला अटक केली होती. त्यानंतर चौकशीसाठी भावना गवळी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण, भावना गवळी या चौकशीला हजर झाल्याच नाही. आज त्यांना चौकशीला हजर व्हायचे होते. पण, त्यांनी ईडीकडे 15 दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यामुळे भावना गवळी यांना ईडी पुन्हा एकदा समन्स बजावते का हे पाहण्याचे ठरणार आहे.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी भावना गवळी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा या शासकीय निवास्थानी पोहोचल्या होत्या. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण, जवळपास दीड तास त्या वर्षा बंगल्यावर प्रतीक्षा करत थांबल्या होत्या. पण, त्यांना भेटीसाठी वेळच देण्यात आला नाही. एवढंच नाहीतर त्यांना कोणताही निरोप देण्यात आला नाही. त्यामुळे ताटकळलेल्या भावना गवळी यांना पक्षप्रमुखांची भेट न घेतात माघारी परतावे लागले होते.
नेमकं प्रकरण काय आहे?
1992 मध्ये भावना गवळी यांचे वडील पुंडलीकराव गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्डाची पणन संचालकाकडे नोंद करून कारखान्याची स्थापना केली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या हमीपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमने बालाजी पार्टीकल बोर्डला 43 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. 2000 सालापर्यंत हा कारखाना फक्त नावाला उभा होता. सुरू मात्र झाला नव्हता. 2001 मध्ये भावना गवळी या कारखान्याच्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर 2002 मध्ये भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची 14 हेक्टर जमीन बेकायदा पद्धतीने आपलीच दुसरी संस्था महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली. विशेष म्हणजे हा व्यवहार करण्यासाठी गवळी यांनी शासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यानंतर 2007 मध्ये राज्य शासनाने बालाजी पार्टीकल बोर्डला विकण्याची परवानगी दिली. तसेच भावना गवळी यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली. हा कारखाना विकण्यासाठी जिल्हा उप निबंधकांने काही अटी शर्ती लावल्या होत्या.
यानंतर 2010 मध्ये बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना भावना गवळी यांचे पीए अशोक गांडोळी यांचे 90 टक्के शेअर असलेल्या भावना ऍग-ो प्रायव्हेट लिमीटेडला विकण्यात आला. यासाठी रिसोड अर्बन क्रेडिट कॉ. बँकची 10 कोटीची बँक गॅरंटी घेत शासनाची परवानगी न घेता विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. याच व्यवहारात मोठा भष्ट्राचार झाल्याचा आरोप हरीश सारडा यांनी ईडीकडे केला आहे. त्यानंतर ईडीने आज ही कारवाई करत भावना गवळी यांच्या विविध ट्रस्ट आणि कंपन्यांचे व्यवहार सांभाळणार्या सईद खान यांना अटक केली आहे.