’धोनीकडून बॅटिंगने आधीसारखा तडाखा पाहायला मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका‘

मुंबई,

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 44 वा सामना 30 सप्टेंबरला खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या स्टाईलने सिक्स खेचत चेन्नईला विजय मिळवून दिला. धोनीने खेचलेला सिक्स पाहून सर्व क्रिकेट चाहत्यांना आधीच्या धोनीची आठवण झाली. मात्र धोनीच्या चाहत्यांनी धोनीकडून तो आधीसारखा दमदार खेळेल, अशी अपेक्षा ठेवू नका, असं माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकर म्हणाला.

संजय मांजरेकर काय म्हणाला?

ठधोनीने हैदराबाद विरुद्ध मारलेल्या सिक्सनंतर क्रिकेट चाहत्यांना आधीचा धोनी आठवला. सर्वांच्या आठवणींना उजाळा मिळाला. मात्र आतापर्यंत धोनीने बॅटिंगने विशेष काही केलं नाही. तसेच धोनी आधीसारखा बॅटिंग करेल, अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही,‘ असं मांजरेकर म्हणाला. तो ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलत होता.

चेन्नईसाठी ’ही’ बाब नुकसानकारक

ठधोनीला बॅटिंगने धमाका करता आलेला नाही. त्याच्या खराब खेळीचा तोटा आणि परिणाम हा चेन्नई टीमवर होतोय. चेन्नईचे इतर टीम चांगली कामगिरी करतायेत. धोनी सध्या फॉर्मात नाही, मात्र कर्णधार म्हणून त्याच्या कामगिरीत काहीही बदल झाला नाही‘, असं मांजरेकरने नमूद केलं. धोनीने आयपीएलच्या 14 व्या मोसमात आतापर्यंत एकूण 12 सामन्यांमध्ये 13.20 च्या सरासरीने अवघ्या 66 धावा केल्या आहेत. धोनीचे या हंगामातील 13 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

कर्णधारपदाचं द्विशतक

धोनीने आयपीएलमध्ये असा कारनामा केलाय, ज्याच्या आसपासही कोणीही नाही. धोनीने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 200 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. धोनी असा कारनामा करणारा पहिलाच कॅप्टन ठरला आहे. धोनीने या 200 पैकी 119 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 79 मॅचेसमध्ये प्रतिस्पर्धी संघाने मात केली आहे. तर 1 सामन्याचा निकाल लागला नाही.

धोनीचा आयपीएलमधील विजयाचा रेकॉर्ड ब-ेक कोणीच करु शकत नाही. धोनीने चेन्नईला आपल्या नेतृत्वात एकूण सामन्यांपैकी 60 टक्के सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. कॅप्टन म्हणून धोनीचा रेकॉर्ड ब-ेक करणं सोप्पं नाही. धोनीने आयपीएलच्या गत मोसमाच्या तुलनेत ज्या पद्धतीने संघात बदल केले आहेत, त्यावरुन धोनी किती महान कर्णधार आहे हे दिसून येत. धोनीचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड शानदार आहे‘, असंही मांजरेकरने म्हंटलं.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!