बनावट पध्दतीने उत्सव करण्यावर अश्विनला या आधी धोनीने फटाकरले होते – सहवाग

मुंबई,

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने रविचंद्रन अश्विनला 2014मधील आयपीएलच्या दरम्यान पूर्वीचा पंजाब किंग्स आणि आताचा पंजाब किंग्स एलेव्हनच्या विरोधातील सामन्यात मॅक्सवेलला बाद केल्यानंतर बनावट पध्दतीने उत्सव करण्यावर फटाकले होते अशी आठवण भारतीय संघाचा माजी सलामीचा फलंदाज वीरेंद्र सहवागने सांगितली.

क्रिकबजने सहवागच्या हवाल्याने म्हटले की मी त्या सामन्यात खेळत होतो आणि अश्विनने मॅक्सवेलला बाद केल्यानंतर उत्सव साजरा करताना थोडी माती घेतली आणि तिला उडविले होते जे मला पसंत आले नव्हते. मी या गोष्टीला कोणा समोरही मांडले नाही आणि हे खेळ भावनाच्या विरुध्द आहे असेही म्हटले नाही. मात्र धोनी या गोष्टीवर नाराज होता आणि नंतर त्याने अश्विनला फटाकरलेही होते.

गुरुवारी अश्विनने सलग टिवीट करत म्हटले होते की ॠषभ पंतला चेंडू लागला की हे मी पाहिले नाही परंतु जर लागला असेल तर धाव दिली असती कारण हे नियमा अंतर्गत आहे.

सहवागला वाटते की यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने मैदानावर घडलेल्या घटनेला सांगायला नको होते. माझ्या मते कार्तीक या पूर्ण प्रकरणात दोषी आहे. जर त्याने सांगितले नसते की इयोन मोर्मनने काय म्हटले आहे तर गोष्ट एवढी वाढली नसती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!