‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस’ कार्यक्रमाचे प्रसारण

मुंबई, 

 जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे 1 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सोमवार दि. 4 आणि मंगळवार 5 ऑक्टोबर रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एअर या अॅपवरून प्रसारण होणार आहे. शिल्पा नातू यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले आहे.

‘दिलखुलास’ या कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे उद्घाटनपर भाषण तसेच ‘समृध्द वृध्दापकाळ’ या विषयावर आयोजित चर्चासत्राचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. या चर्चासत्रात मुंबईच्या माजी महापौर सौ. निर्मला सामंत प्रभावळकर, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, फेस्कॅामचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे तसेच हेल्पेज इंडियाचे सहसचिव दिनेश डिंगळे यांचा सहभाग आहे. या चर्चासत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कायदे, ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना,ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम,ज्येष्ठ नागरिकांनी  संवाद कसा करावा,दोन पिढीतील संवाद या विषयांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!