नवज्योत सिंग सिद्धू ’द कपिल शर्मा शो’मध्ये परतणार? अर्चना पूरन सिंहने सांगितली ही गोष्ट
मुंबई,
नवज्योतसिंग सिद्धूने पंजाब काँग-ेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून सोशल मीडियावर त्यांच्याच नावाची चर्चा होत आहे. तसेच आता ते ’द कपिल शर्मा’ शो पुन्हा जॉईन करणार का? अर्चना पूरन सिंह आता ’द कपिल शर्मा’ सोडणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. खरेतर नवजोतसिंग सिद्धू यांची जागा अर्चनाने 2019 मध्ये घेतली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत कपिलच्या वक्तव्यानंतर सिद्धू यांना शोमधून काढून टाकण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्यांची जागा अर्चना पूरन सिंहने शोमध्ये घेतली.
आता जेव्हा नवज्योतसिंग सिद्धूने पंजाब काँग-ेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तेव्हापासून अर्चना पूरन सिंह आणि कपिलच्या शोबद्दल मीम्स बनू लागल्या. चाहत्यांच्या मनातही प्रश्न निर्माण होत आहे की, अर्चना आता या शोमध्ये राहणार की सोडणार? आता या सर्व प्रश्नांवर अर्चना पूरन सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जेव्हा अर्चनाला तिच्या आणि कपिलच्या शोमध्ये बनवल्या जाणार्या मीम्सबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, ’हा विनोद वर्षानुवर्षे माझ्यासाठी मारला जात आहे, पण मी त्याची पर्वा केली नाही किंवा गांभीर्याने घेतलं नाही.
सिद्धूला शोमध्ये परत यायचे असेल आणि माझी जागा घ्यायची असेल तर माझी काही हरकत नाही. माझ्याकडे आणखी अनेक कामं आहेत, ज्या मी गेल्या अनेक महिन्यांत नाकारल्या होत्या, त्या मी आता करु शकते. मी या शोसाठी आठवड्यातून 2 दिवस शूट करत असल्याने, मी मुंबई किंवा भारताबाहेरील कोणताही अन्य प्रकल्प घेऊ शकत नाही.
अर्चना पूरन सिंह पुढे म्हणाली, ’गेल्या काही महिन्यांत मला लंडन आणि इतर देशांमध्ये प्रोजेक्ट शूट करण्याची संधी मिळाली होती, पण माझ्या या शोसाठी असलेल्या बांधिलकीमुळे मला या सर्वांना नाही म्हणावे लागले.’
अर्चना पूरन सिंगसाठी अनेकदा असे म्हटले गेले आहे की, ती ’द कपिल शर्मा शो’ मध्ये हसण्याशिवाय काहीच करत नाही. शो मध्ये सुद्धा तिच्यावर एक विनोद मारला जातो की ती हसण्याशिवाय काहीच करत नाही.
त्यावर उत्तर देत अर्चना म्हणाली, ‘कपिलच्या शोचे लेखक सर्व प्रकारचे मजेदार विनोद घेऊन येतात आणि मी त्यांच्यावर हसणे थांबवू शकत नाही. दररोज अशा मजेदार गप्पा आणि विनोद घेऊन येणे आणि सलग 10 वर्षे शो चालू ठेवणे हे खरोखरच कठीण काम आहे. पण ज्यांना असे वाटते की मी शोमध्ये काहीच करत नाही, त्यांनी सेटवर यावे आणि पाहावे की 6-7 तास एकाच स्थितीत स्टेजकडे तोंड करून बसणे सोपे नाही. मला 4-7 तास सोफ्यावर बसावे लागेल, स्टेजवर बघावे लागेल, प्रत्येक विनोद ऐकावा लागेतो आणि त्यावर प्रतिक्रिया द्यावी लागेल.