1 ऑॅक्टोबरपासून पेमेंटपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत बदलणार हे 7 नियम
मुंबई,
ऑॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामनान्य ग-ाहकांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. कारण 1 ऑॅक्टोबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. हे नियम जर तुम्हाला माहिती नसतील तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आजच कोणते नियम बदलले आहेत हे जाणून घ्या.
ऑॅक्टोबर महिन्यापासून अनेक दैनंदिन गोष्टी बदलणार आहेत. हे बदल विशेष माणसाच्या जीवनाशी संबंधित आहेत. यामध्ये बँकिंग नियमांपासून एलपीजीच्या किंमतींपर्यंत अनेक बदलांचा समावेश आहे.
पेंन्शन नियमांत बदल
डिजिटल लाइफ सर्टिफिकेटशीं संबंधित नियम बदलण्यात आले आहेत. 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शन धारकांना जीवन प्रमाण सेंटरवर डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जमा करावं लागणार आहे. याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे.
ऑॅटो पेमेंटच्या नियमात बदल
ींँघ्च्या नव्या नियमानुसार ऑॅटो पेमेंटपूर्वी अॅडिशनल फॅक्टर ऑॅथेंटिकेशन करावं लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला ऑॅटो पेमेंटची कल्पना बँकेकडून ग-ाहकांना दिली जाणार आहे. ऑॅटो पेमेंट करण्यापूर्वी, तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म आणि बँकेद्वारे ऑॅटो पेमेंटबद्दल माहिती दिली जाईल. जर तुम्हाला रिचार्ज चालू ठेवायचे असेल तर तुम्हाला ऑॅटो पेमेंटला परवानगी द्यावी लागेल. ऑॅटो पेमेंट ध्ऊऊ साठीच नाही तर इतर ठिकाणी देखील तुम्हाला व्हेरिफिकेशन पुन्हा एकदा केल्याशिवाय होणार नाही.