आरोग्य विभाग व टीईटीची परीक्षा एकाच दिवशी; उमेदवारांचे नुकसान होऊ देणार नसल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती
मुंबई,
आरोग्य विभागाची भरती परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने मोठा गदारोळ झाला. अखेर आरोग्य विभागाकडून गट ’क’ साठी 24 तर गट ’ड’ साठी 31 ऑॅक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र त्याच दिवशी राज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांमध्ये संभ-माचे वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण संचालकांशी आपण बोलून मार्ग काढणार आहोत. उमेदवारांचे नुकसान होऊन देणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
आयटी कंपनीच्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली होती. मात्र त्यातून आरोग्य विभागाने मार्ग काढत 24 व 31 ऑॅक्टोबरला परीक्षा घेण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. मात्र त्याचदिवशी शिक्षण विभागाकडून टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सर्व शिक्षकांसाठी बंधनकारक असून, यापूर्वी ही परीक्षा 10 ऑॅक्टोबरला होणार होती. मात्र त्याचदिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही परीक्षा 31 ऑॅक्टोबरला पुढे ढकलण्यात आली आहे. त्यातच आता आरोग्य विभागाची परीक्षाही त्याच दिवशी होणार आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व टीईटीची परीक्षा देणार्?या उमेदवारांना दोन्ही परीक्षा देणे शक्य होणार नसल्याने उमेदवारांमध्ये संभ-माचे वातावरण आहे.
उमेदवारांचे नुकसान होणार नाही याची सरकारकडून काळजी घेण्यात येईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बोलून टीईटी परीक्षेच्या तारखेबाबत विचार करण्याची त्यांना विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. मुलांचे नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षण संचालकांशीही बोलणार आहे. अजून एक महिना आहे. यातून मार्ग काढला जाईल, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.