प्रथमोपचारामुळे हृदयविकाराचा झटका टाळणे शक्य याबाबत एकतृतीयांशपेक्षा अधिक व्यक्ती अनभिज्ञ

दरवर्षी 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन पाळला जातो, याची बहुतांश ( 64 टक्के) भारतीयांना जाणीव

नियमित वैद्यकीय तपासणी 77 टक्के व्यक्ती करतात, परंतु त्यातील 70 टक्केच व्यक्ती ह्दयाची तपासणी करुन घेतात आणि तीही वर्षात एकदात

ह्दय आणि हृदयातील रक्तवाहिन्यांच्या ( सीव्हीडी) विकाराबाबत केवळ 63 टक्के भारतीयांनी दाखविली जागृती

मुंबई, ता. 30 सप्टेंबर 2021:

निरोगीपणा आणि आजार या दोन्हींकडे पाहण्याचा दृष्टीकोन पुर्णपणे बदलण्याच्या बाबतीत यंदाचे 2020 हे वर्ष महत्वपुर्ण ठरले आहे. जागतिक हृदय दिन 2021 कडे आपण वाटचाल करत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे निरोगी आरोग्याबाबत वाढता सहभाग दिसत असला तरी आरोग्याबाबत अतिजागरूक व्यक्तींच्या या नवगटात अद्यापही हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसारख्या (सीव्हीडी) विशिष्ट आजारांबद्दल प्रभावी जागरूकता दिसून येत नाही. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सच्या सर्वेक्षणानुसार, 51 टक्के उत्तरकर्त्यांच्या मते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग हे भारतात मृत्यूचे प्रमुख कारण होय. भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने महामारीपश्चातील जगात ह्दयविकारासंदर्भात असलेली जागरुकता आणि आकलन जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात कोवीडचा परिणाम खोलवरपणे जाणून घेण्यात आला. तसेच या काळात नागरिकांनी मानसिक तणाव आणि ह्दयाच्या समस्या कशा सांभाळल्या याचीही माहिती संकलित करण्यात आली.

सीव्हीडीबाबत नागरिकांचे आकलन आणि विचारधारा सखोलपणे जाणून घेण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डने महानगरे, टियर वन आणि टियर टू शहरात विविध वयोगट, विविध क्षेत्रात घरुन आणि अंशतः घरुन कार्यरत असणारे कर्मचारी तसेच विमाधारक आणि बिगर विमाधारक आदींचा समावेश असलेल्या 1490 व्यक्तींचे सर्वेक्षण केले. या सवेक्षणातून 77 टक्के व्यक्ती या नियमित तपासणीसाठी , तर त्यातील फक्त 70 टक्केच व्यक्ती वर्षात एकदा हृदयाच्या तपासणीसाठी जात असल्याचे आढळले.

या आरोग्य आणि निरोगी आयुष्याबाबतच्या सर्वेक्षणाबाबत टिप्पणी करताना आयसीआयसीआय लोम्बार्डचे दावेलेखन, फेरविमा आणि दावापुर्ती विभागाचे प्रमुख संजय दत्ता म्हणाले की, महामारीचा आपल्या सर्वांच्या आरोग्यावर झालेल्या परिणामांच्या तीव्रतेशी जोडल्या गेलेल्या अन्य व्याधींबाबत असलेल्या अनभिज्ञतेमुळे आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करणे हे अधिक महत्वाचे ठरते. सुदृढ ह्दयासह आरोग्यदायी जीवनशैली ही एखाद्याच्या प्रतिकारशक्तीला पुरक ठरु शकते. तणावरुपी चिंता आपल्या धावपळीच्या आयुष्याभोवती तिची पकड घट्ट करत असताना सक्रीय जीवनशैलीबरोबरच आपल्या मानसिक आरोग्याची देखभाल करणे अत्यावश्यक ठरले आहे. अशा काळात, स्वतःसाठी त्याचबरोबर कुटूंबातील सदस्यांसाठी विमा पॉलिसी विकत घेणे हे अतिशय महत्वाचे पाऊल ठरले आहे, कारण वैद्यकीय उपचार हे खंर्चिक होत चालले आहेत. पॉलिसीमुळे लोकांच्या मनात आरोग्य आणि आर्थिक सुरक्षा निर्माण होते आणि त्य़ातून मानसिक शांतताही लाभते.

भारतीयांमध्ये जागरुकता, समज आणि तयारी

दरवर्षी 29 सप्टेंबरला येणारा जागतिक हृदयदिन बहुतांश (64 टक्के) भारतीयांना माहित असल्याचे सर्वेक्षणात आढळले. तरुणांमध्ये (45 वषापेक्षा कमी वयाचे) हृदयाशी संबंधित विकारांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत असले तरी दोन तृतीशांपेक्षा कमी (63 टक्के) उत्तरकर्त्यांना सीव्हीडीशी संबंधित विकार हे अगदी तरुण वयातसुध्दा दिसून येत असल्याचे माहित आहे. चाळीसीपेक्षा अधिक वयोगटात ( 63 टक्के ), ज्यात विकाराची शक्यता अधिक असते, त्यांच्यात कमी प्रमाणात जागरुकता दिसली आहे. प्रथमोपचारामुळे ह्दयविकाराचा झटका टाळता येऊ शकतो, याबाबत एक तृतीयांशपेक्षा अधिक व्यक्ती अनभिज्ञ असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे.

सीव्हीडीच्या कारणांबाबत माहिती जाणून घेतली असता, कोलोस्ट्रॉल आणि अतितणाव (57 टक्के), ताण (55 टक्के ) आणि लठ्ठपणा (52 टक्के) हे ह्दयविकाराची तीन प्रमुख कारणे असल्याचे उत्तरकर्त्यांना वाटते. याउलट चिंतेची बाब म्हणजे 18 टक्के उत्तरकर्त्यांना या तीन कारणांबाबत काहाही माहिती नाही. दिल्ली, बंगळुर, हैदराबाद आणि अहमदाबाद यासारख्या प्रमुख महानगरे आणि टियर वन शहरात ह्दयविकाराच्या प्रमुख कारणांबाबत कमी प्रमाणात जागरुकता दिसली. याचबरोबर हृदयविकाराचा त्रास झालेल्यांपैकी महिलांच्या (44 टक्के) तुलनेत पुरुषांमध्ये ( 50 टक्के ) अधिक जागरुकता दिसून आली.

कोवीड-19 चा व्यक्तींच्या ह्दयावरील ताण

जागरुकता असुनही महामारीच्या काळात ह्दयविकाराच्या रुग्णांची नियमित तपासणीचे प्रमाण घसरले. ह्दयविकाराच्या रुग्णांच्या वार्षिक तपासणीचे कोरोनापुर्वी असलेले 92 टक्के प्रमाण कोरोनाच्या काळात 77 टक्क्यांवर घसरले. महामारीमुळे लागलेले लॉकडाऊन हळूहळू हटविण्यात येऊ लागल्यानंतर तपासणीचे प्रमाण 83 टक्क्यांपर्यंत वाढले. ह्दयविकाराचे निदान झालेल्या व्यक्तींपैकी 56 टक्के व्यक्तींना स्वतः कोवीडचा संसर्ग झाला तर 25 टक्के व्यक्तींना त्यांच्यासोबत राहत असलेल्या कुटूंबियांच्या माध्यमातून संसर्ग झाला. ह्दयविकाराने ग्रस्त सर्व व्यक्तींचा विचार करता महिलांना (69 टक्के) पुरुषांच्या (43 टक्के) तुलनेत अधिक प्रमाणात संसर्ग झाल्याचे आढळले. त्याचबरोबर ह्दयविकाराचा त्रास असलेल्या चाळीशीपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये (64 टक्के) कोवीडचा संसर्ग 41 वयापेक्षा कमी वय असलेल्यांच्या (53 टक्के) तुलनेत अधिक प्रमाणात दिसून आला.

व्याधींचे निदान झालेल्यांमध्ये महामारीमुळे शाररीक परिणाम झाल्याचे आढळले तर सुदृढ व्यक्तींना केवळ मानसिक तणावच नव्हे तर ह्दयविकार अथवा झटक्याच्या भितीने ग्रासले होते. त्यातील तीन चतुर्थांश व्यक्तींमध्ये कोवीडमुळे ही जोखीम वाढल्याची भावना होती. ही भावना बिगर विमाधारकांच्या (63 टक्के) तुलनेत विमाधारकांमध्ये (82 टक्के) अधिक प्रबळपणे दिसूनआली. त्याचबरोबर ही भावना बाधित कुटूंबाचा भाग असलेल्या व्यक्तींच्या (76 टक्के) तुलनेत स्वतःला कोवीडचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये (83 टक्के) अधिक होती.

वाढलेला ताण हा महामारीची एक वेगळा त्रास समोर आला असून एक तृतीयांश व्यक्तींमध्ये कोवीडपश्चात ताण वाढल्याचे दिसून आले तर त्यापैकी 51 टक्के जणांना कोवीडचा संसर्ग झाला तर 38 टक्के व्यक्तींमध्ये ते राहत असलेल्या कुटूंबातील सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. आणखी खोलात गेले असता कोवीड संसर्गाच्या पश्चात दोन तृतीयांश व्यक्तींना ह्दयविकाराशी संबंधित त्रास झाला. ही समस्या टियर वन आणि टू शहरांच्या (सुमारे 67 टक्के) तुलनेत महानगरात (55 टक्के) कमी प्रमाणात आढळून आली आहे.

बदलत्या जीवनशैलीच्या माध्यमातून आशेचा नवा किरण

उज्वल बाजूचा विचार करता, एक तृतीयांशपेक्षा अधिक व्यक्तींनी हदयाचे सक्षम आरोग्य लाभण्यासाठी जीवनशैली, आहार आणि पर्यावरणात बदल आणि जाणीवपुर्वक प्रयत्न करत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. तरुण वयोगटाच्या तुलनेत बदल करण्याची अधिक जाणीव असल्याने हा बदल 41 ते 50 वर्ष या वरिष्ठ वयोगटात अधिक प्रमाणात दिसून आला आहे. तसेच कोवीड-19 मुळे हृदयविकार अथवा झटक्याचा धोक्याची अधिक जोखीम असल्याची धारणा असलेल्या व्यक्तींमध्ये (दोन पंचमांशपेक्षा अधिक) जीवनशैलीत सकारात्मक बदल करण्याची प्रवृत्ती हीच जाणीव नसलेल्या व्यक्तींच्या (24 टक्के) तुलनेत अधिक प्रमाणात आढळली. यात महिलांनी अधिक आघाडी घेतली आहे. 32 टक्के पुरुषांच्या तुलनेत 45 टक्के महिला चांगले आरोग्य लाभण्यासाठी त्यांच्या जीवनशैलीत आवश्यक ते बदल घडवून आणत आहेत.

अहवालाच्या निष्कर्षांबाबत टिप्पणी करताना श्री. दत्ता म्हणाले की, या सर्वेक्षणाने असे दाखवून दिले की लोकांना निरोगी दिनचर्येचे पालन करण्यासाठी सर्वोच्च प्रेरणा देणारे घटक म्हणजे उत्तम मानसिक आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूकता हे आहेत. एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबाचे आरोग्य हे मानसिक आरोग्य राखण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावते. कारण सीव्हीडीच्या विकाराने त्रस्त असलेल्या कुटुंबातील व्यक्ती (62%) स्वतः सीव्हीडीने त्रस्त असलेल्या व्यक्तींच्या (50 टक्के) तुलनेत स्वतःचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी अधिक प्रेरित असल्याचे दिसून आले आहे. स्वतःचे आणि त्यांच्या प्रियजनांचे संपूर्ण कल्याण राखण्यासाठी आर्थिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक गुंतवणूक करण्याची प्रवृत्ती जनमानसातील या आमुलाग्र बदलामुळे वाढली आहे. ”

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!