जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांचे पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले कौतुक
मुंबई,
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ऑॅगस्ट महिन्यात ऑॅनलाईन छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पाहणी करून यातील उत्कृष्ट छायाचित्रांचे कौतुक केले.
दि. 19 ऑॅगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त पर्यटन संचालनालयामार्फत ‘महाराष्ट्र थ-ू माय लेन्स’ या ऑॅनलाईन छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला छायाचित्रकारांचा मोठा प्रतिसाद लाभला. यापैकी उत्कृष्ट ठरलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जागतिक पर्यटन दिनानिमित्त सोमवार दि.27 सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात भरवण्यात आले. ही छायाचित्रे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांना पाहता यावीत यासाठी मंत्रालयातही हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
गड-किल्ले, समुद्र किनारे, निसर्ग, ग-ामीण व शहरी जनजीवन, वन्यजीव, पंढरीची वारी आणि वारकरी, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेली स्थळे अशा महाराष्ट्रातील विविधांगी वैभवाच्या छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे.