गावस्कर म्हणाले, या खेळाडूला बनवा टी-20 संघाचा कर्णधार

मुंबई,

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अलीकडेच भारताचे टी-20 कर्णधारपद सोडण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. 2021 टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहली भारताच्या टी-20 कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. अशा परिस्थितीत भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीच्या जागी भारताचे टी-20 कर्णधारपद कोणाला बनवले पाहिजे याबाबत वक्तव्य केले आहे. विराट कोहलीच्या जागी एक स्टार क्रिकेटपटू आहे जो टी -20 चे कर्णधारपद सांभाळू शकतो, असा विश्वास सुनील गावसकर यांनी व्यक्त केला.

पुढील दोन विश्वचषकांसाठी रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार बनवावे, असे सुनील गावस्कर यांचे म्हणणे आहे. गावस्कर म्हणतात की, टी-20 विश्वचषक सलग दोन वर्षे होणार आहे आणि त्यासाठी रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवले पाहिजे. स्टार स्पोटर्स शो क्रिकेट कनेक्टेडमध्ये गावस्कर म्हणाले, ’भारतासमोर पुढील दोन विश्वचषक आहेत आणि अशा स्थितीत रोहित शर्माला कमान द्यावी. एक विश्वचषक पुढील महिन्यात सुरू होईल, तर दुसरा टी-20 विश्वचषक पुढील वर्षी होणार आहे.

गावसकर म्हणतात की पुढील दोन टी-20 विश्वचषकांसाठी रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार बनवावे. उपकर्णधारपदासाठी मी केएल राहुलसोबत जाईन. ॠषभ पंतचे नावही माझ्या मनात आहे कारण त्याने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद अतिशय प्रभावीपणे सांभाळले आहे. ॠषभ पंतने गोलंदाजीत केलेले बदल मला खरोखर प्रभावित केले. ॠषभ पंतने नॉर्टिजे आणि रबाडाचा वापर ज्या हुशारीने केला तो दाखवतो की तो एक हुशार कर्णधार आहे आणि आपल्याला अशा कर्णधाराची गरज आहे.’

आता बीसीसीआयने विराट कोहलीचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर मोठे अपडेट दिले आहे. मंगळवारी, जेव्हा बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांना विचारण्यात आले की, ’विराट कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडण्याचा निर्णय स्वत:चा आहे की त्याला सक्ती केली होती? यावर धुमाळ म्हणाला, ’बोर्डाने त्याला पद सोडण्यास सांगितले नाही. तो पूर्णपणे त्याचा स्वत:चा निर्णय होता. आम्ही त्याला हे का करायला सांगू? तो उत्तम कामगिरी करत होता.’

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!