भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस
मुंबई
भारत देशासह संपुर्ण जगाला आपल्या सुमधूर आवाजाने प्रत्येत श्रोत्याला मंत्रमुग्ध करणार्या गानस्र-ाज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज 92 वा वाढदिवस. आज जगभर त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. लतादीदी गेल्या अनेक दशकांपासून आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत आहेत. 28 सप्टेंबर 1929 मध्ये इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांनी आतापर्यंत 25 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. महाराष्ट्रासह देशभरात कित्येकांची त्यांच्या आवाजातील गाणे ऐकल्याशिवाय सकाळ होत नाही.
लता मंगेशकर यांनी त्यांच्या आवाजाच्या जोरावर
संगीतक्षेत्रात एक अढळ असं स्थान लता मंगेशकर यांनी निर्माण केले आहे. या काळात दीदीला आतापर्यंत हजारो पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, (2001)मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. कोणत्याही क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार भारत सरकारच्या वतीनं दिला जातो. आतापर्यंत 3 नॅशनल अवार्ड, पद्मभूषण, दादासाहेब फाळके आणि पदमविभूषण हे पुरस्कार देऊनही दिदींना गौरवण्यात आलं आहे.1974 ते1991 या काळात सर्वाधिक गाण्यांची रेकॉर्डिंग केल्याने दीदींचे नाव ’गिनेस बुक ऑॅफ वर्ल्ड रेकॉड्?र्समध्ये आहे.
उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे घेतले
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्या अनेक वर्षे रंगभूमीवरही कार्यरत होत्या. 1942 मध्ये लता मंगेशकर 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यानंतर 1945 मध्ये दीदी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत मुंबईत आल्या. त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. त्यानंतर 1946 मध्ये ‘आपकी सेवा में’ या सिनेमात ‘पा लागूं कर जोरी’ हे गाणे गायले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या टिवटरवरू शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लता दिदिंना वाढदिवसाच्या टिवटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. आदरणीय लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचा मधूर आवाज जगभर गाजतो आहे. भारतीय संस्कृतीप्रती त्यांची नम-ता आणि उत्कटतेबद्दल त्यांचा कायम आदर आहे. त्यांचे आशीर्वाद हे महान शक्तीचे स्रोत आहेत. मी लता दिदिंच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो. अस आपल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधान म्हणाले आहेत.