पिएम मोदी राजवटीत शेअर बाजारात सोन्याचे दिवस! सेन्सेक्स 25000 वरुन 60 हजारांपार; भविष्यातही येणार ’अच्छे दिन’

मुंबई,

शुक्रवारचा दिवस (24 सप्टेंबर 2021) भारतीय शेअर बाजारासाठी ऐतिहासिक दिवस होता. सेन्सेक्स ने पहिल्यांदा 60 हजारांचा आकडा पार केला आहे. सुमारे 41 वर्षांपूर्वी 100 च्या बेसिस पॉईंटने सुरू झालेला सेन्सेक्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यावर 2014 मध्ये 25 हजारांवर पोहोचला होता आणि आता सेन्सेक्सने 60 अंक पार केले आहेत.

2014 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये एनडीएचे सरकार स्थापन झाले होते, त्यावेळी देखील शेअर बाजारात विशेष उत्साह होता. पहिल्यांदा 16 मे 2014 रोजी सेन्सेक्स 25,000 अंकांच्या पार पोहोचला होता. आता शेअर मार्केट तज्ज्ञांच्या मते, शेअर बाजार लवकरच 1 लाख अंकावर पोहोचण्याची शक्यता आहे.

8 महिन्यात 10000 अंकानी झाली वाढ

शुक्रवारी म्हणजे काल 24 सप्टेंबर रोजी सेन्सेक्स पहिल्यांदा 60,000 च्या पलीकडे बंद झाला होता. कोव्हिडमध्ये शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. दरम्यान एप्रिल 2020 नंतर बाजारात काहीशी सुधारणा दिसली. बाजारात रिकव्हरी पाहायला मिळाली. यानंतर काही वेळा कंसोलिडशन आणि किरकोळ करेक्शनसह मजबुती कायम राहिली आहे. बाजारासाठी हे चांगले संकेत आहेत.

विेषकांचे म्हणणे आहे की, कंपन्यांचे निकाल आणि आर्थिक आकडेवारीमुळे बाजारात सुधारणा होईल. जर बाजारात घसरण झाली तर याचे कारण देशांतर्गत नसून जागतिक असेल. बाजारातील दिग्गजांचा असा विश्वास आहे की यूएस फेडच्या बॉण्ड खरेदी योजनेत कपात होण्यापासून बाजारात कोणतीही भीती नाही. श्रीकांत चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांचे चांगले परिणाम येत्या काही महिन्यांत बाजाराला सपोर्ट देतील.

मार्केट तज्ज्ञ असणार्‍या चौहान यांनी गुंतवणूकदारांना असा सल्ला दिला आहे की, चांगले व्यवस्थापन आणि मजबूत मूलभूत तत्त्वे असलेल्या कंपन्यांमध्ये लाँग आणि मीडियम टर्मच्या दृष्टीकोनातून खरेदी करा. असा देखील सल्ला आहे की- तुमचे सर्व पैसे एकदाच किंवा दोन वेळेमध्ये गुंतवू नका, तर अधूनमधून डाउनट्रेन्डमध्ये गुणवत्तापूर्ण स्टॉक खरेदी करण्याची रणनीती स्वीकारा.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!