मंदिरे 7 ऑॅक्टोबरपासून उघडणार : सरकारची नवी नियमावली पाहूनच मंदिरात जा, अन्यथा..

मुंबई,

कोरोनाचा धोका असल्याने राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील मंदिरे 7 ऑॅक्टोबरपासून खुली होणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. प्रसादवाटप, भाविकांची संख्या आणि दुकानदारांसाठी काही नियम असणार आहेत. हे नियम जाणून घ्या.

राज्यात आता सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निश्चित अशी नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, मंदिर मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर विरोधकांकडून आणि काही स्थानिक संस्थांकडून होणारी मागणी मान्य झाली आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्यावर गेल्या एप्रिलमध्ये सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली होती. रुग्ण कमी झाल्याने प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार ही परवनागी देण्यात आली आहे.

प्रार्थनास्थळांसाठीची अशी आहे नवी नियमावली

1. 65 वर्षांवरील नागरिक, सहव्याधी असलेले नागरीक, गर्भवती महिला आणि 10 वर्षांखालील मुलांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे संबंधित प्रार्थनास्थळाचे व्यवस्थापन कर्मचारी आणि भेट देणार्‍या नागरिकांनी पालन करावे लागेल.

2. शक्य त्या सर्व ठिकाणी किमान 6 फुटांचे अंतर पाळावे लागणार आहे. यावेळी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असेल. साबणाने किमान 40 ते 60 सेकंद किंवा सॅनिटायझरने किमान 20 सेकंद हात वारंवार धुवावेत.

3. थुंकण्यावर सक्त मनाई असेल. असे कोणी केले तर त्याला दंड आकारण्याचे निर्देश प्रार्थनास्थळांना देण्यात आले आहेत. तसेच, आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅप इन्स्टॉल करण्याचा देखील सल्ला देण्यात आला आहे.

4. प्रत्येक प्रार्थनास्थळाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर आणि थर्मल स्कॅनर बंधणकारक आहे.

5. प्रार्थनास्थळाच्या आवारात येण्यासाठी फक्त कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. तसेच, मास्क किंवा फेस कव्हर घातलेल्या लोकांनाच प्रार्थनास्थळात प्रवेश द्यावा.

6. सर्व प्रार्थनास्थळांमध्ये कोरोनाविषयी जागृती आणि सूचना देणारे फलक लावणे बंधनकारक

7. कोणत्याही प्रार्थनास्थळामध्ये किती भाविकांना प्रवेश दिला जावा, याचा निर्णय संबंधित प्रार्थनास्थळाच्या व्यवस्थापन समिती आणि ट्रस्टने घ्यावा. हा निर्णय प्रार्थनास्थळाचा आकार, हवेशीरपणा, भाविकांमध्ये सहा फूट अंतर ठेवण्याच्या नियमाचे पालन हवे.

8. भाविकांनी आपल्या चपला आपापल्या वाहनांमध्येच ठेवाव्यात. किंवा नेमून दिलेल्या जागेत स्वतंत्र ठेवाव्यात.

9. प्रार्थनास्थळाच्या पार्किंगच्या जागेत आणि आजूबाजूला कोरोनाच्या नियमांना अनुसरून योग्य प्रकारे गर्दीवर नियंत्रण करावे. रांगा लावण्यात याव्यात.

10. प्रार्थनास्थळांच्या बाहेर असणारे कोणतेही ठेले, पथारीवाले, फेरीवाले किंवा दुकानदार यांनी कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन करायला हवे.

11. प्रार्थनास्थळामध्ये येण्यासाठी आणि जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग असावेत. कोणालाही स्पर्श करु नये. प्रार्थनास्थळात येताना भाविकांनी त्यांचे हात आणि पाय साबणाने धुवूनच प्रवेश करावा.

13. प्रार्थनास्थळांमध्ये बसण्याची व्यवस्था अशी करावी जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल. अशा ठिकाणी एसीचं टेम्परेचर सेटिंग हे 24 ते 30 डिग-ी सेल्सिअरदरम्यान असावे. आर्द्रतेचे प्रमाण 40 ते 70 टक्के असावे. क्रॉस व्हेंटिलेशन आणि भरपूर शुद्ध हवा आवारात असायला हवी.

13. प्रार्थनास्थळावर कोणतीही मूर्ती, पुस्तक यांना हात लावण्याची परवानगी भाविकांना नसेल. मोठी गर्दी किंवा एकत्र जमण्यावर बंदी असेल.

14. प्रार्थनास्थळी सर्व भाविकांनी प्रार्थनेसाठी लागणारी स्वतंत्र चटई आणावी. एकाच चटईवर सर्वांनी बसू नये. तसेच, प्रसाद वाटप वा पवित्र जल फवारणी या गोष्टींवर बंदी असेल.

15. प्रार्थनास्थळी नियमित अंतराने सॅनिटायझेशन आणि स्वच्छता केली जावी. विशेषत: जमीन सातत्याने स्वच्छ केली जायला हवी.

16. स्वच्छतागृहे आणि खाण्याच्या ठिकाणी गर्दीचं योग्य नियोजन केलं जावं.

17. जर एखादी व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळल्यास, त्या व्यक्तीला स्वतंत्र खोलीत किंवा विलगीकरणात ठेवावे. डॉक्टरांनी त्या व्यक्तीची तपासणी करेपर्यंत तिने मास्क घालून ठेवावा. याची माहिती नजीकच्या आरोग्य सुविधा केंद्र वा रुग्णालय वा क्लिनिकला द्यावी.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!