मुंबईत शाळा सुरु करण्याबाबत पालिकेचा सावध पवित्रा
मुंबई
राज्यातील शाळा 4 ऑॅक्टोबरपासून सुरू होणार आहेत. ग-ामीण भागात पाचवी ते बारावी शाळा सुरु होणार आहेत तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र मुंबई महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे. शासन आदेशानुसार मुंबईतील शाळा सुरु होऊ शकतील, पण 5 ऑॅक्टोबरपर्यंतच्या पॉझिटीव्हिटी रेटवर प्रशासनाचे लक्ष आहे. कोरोना पॉझिटीव्हिटी रेट वाढला तर मुंबईत शाळा सुरु करण्याबाबत पुर्नविचार होऊ शकतो, असे संकेत पालिका प्रशासनाने दिला आहे.
शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षक आणि 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या विशेष व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरु करण्यात येणार आहे. मुंबईत गणेशोत्सवानंतर बाहेरगावहून विशेषत: कोकणातून प्रवास करुन येणार्या मुंबईकरांची कोविड तपासणी करण्यावर प्रशासनाने लक्ष दिले आहे.
मुंबईत सध्या पॉझिटीव्हिटी रेट 0.06 टक्के आहे. 100 पैकी एक ते दोन जणांचे कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. मुंबईत 15 टक्के बेडवरच रुग्ण आहेत. तर 85 टक्के बेड खाली आहेत. कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने शाळा सुरु करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर मुंबईत महापालिकेचे शाळा सुरु करण्याबाबत हालचाली सुरु आहेत. कोरोना परिस्थितीवर विशेष मुंबई पालिकेचे लक्ष आहे.
दरम्यान, दिवाळीनंतर मुंबईतील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. महापौर पेडणेकर यांनी गुरुवारी सांगितले की, महाराष्ट्राची राजधानी आणि आसपासच्या परिसरातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाईल.
यापूर्वी, एका टास्क फोर्सने संपूर्ण महाराष्ट्रात शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी मानक ऑॅपरेटिंग प्रक्रिया सादर केली आहे. तज्ज्ञ पॅनेलने शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी पूर्ण लसीकरणाची शिफारस केली आहे. बालरोग टास्क फोर्सने बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी ग-ीन सिग्नल दिला.