कपिल शर्मा धोकाधडी प्रकरण : दिलीप छाबडियाच्या मुलाला अटक

मुंबई

कॉमेडियन कपिल शर्माद्वारा दाखल केलेल्या धोकाधडीच्या तक्रारी अंतर्गत मुंबई पोलिसांनी प्रसिध्द वाहन डिझाइनर दिलीप छाबडियांचा मुलगा बोनिटो छाबडियांला अटक केली आहे अशी माहिती एका पोलिस अधिकार्‍याने शनिवारी दिली.

आर्थिक गुन्हा शाखा (ईओडब्ल्यू) द्वरा बोलावलेल्या बोनिटोला चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्याच्या वडिलांना गुन्हे शाखेद्वारा डिसेंबर 2020 मध्ये वाहन फाइनेंसिंग रॅकेटमध्ये अटक केल्यानंतर जवळपास 10 महिन्यानंतर बोनिटोला अटक करण्यात आली.

शर्माने मागील वर्षी आपल्या तक्रारीमध्ये दावा केला होता की एक डिझाइनर व्हॅनिटी बस व्यवहारामध्ये छाबडिया आणि अन्य जणांनी त्यांना 5.30 कोटी रुपयांना फसविले होते.

कपिल शर्माने म्हटले की त्यांनी मार्च-मे 2017 मध्ये बससाठी छाबडियाना 5 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम दिली होती परंतु 2019 पर्यंत वाहन मिळाले नाही यानंतर त्यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे अर्ज केला.

मागील वर्षी छाबडियानी व्हॅनिटी बसच्या डिलीव्हरीसाठी पार्किंग शुल्काच्या रुपात 1.20 कोटी रुपयांचे बिल दिले.  यानंतर शर्माने सप्टेंबर 2020 मध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

तपासा दरम्यान बोनिटो छाबडियाचा सहभाग समोर आला आणि त्याला चौकशीसाठी बोलावले गेले. यानंतर त्याला शनिवारी अटक करण्यात आली.

क्राइम ब-ँचने दिलीप छाबडियाला 28 डिसेंबर 2020 ला 22 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या बहु राज्य वाहन फाइनेंसिंग रॅकेटसाठी अटक केली आणि या वर्षी त्यांना जमानत मिळाली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!