बिग बॉस मराठी; इंदुरीकर महाराजावरून तृप्ती देसाई आणि शिवलीला पाटील यांच्यात वाद

मुंबई,

‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील जितका वादग-स्त आणि तितकाच लोकप्रिय शो असून नुकतेच ‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व सुरु झाले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसर्‍या पर्वाला सुरुवात होताच या शोने प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतले आहे. स्पर्धकांमध्ये शो सुरु होताच ओढाताण सुरु झाली आहे. त्यात यंदाच्या पर्वात कलाकार, राजकारणी ते किर्तनकार आणि समाजसेवकांपर्यंत वेगवेगळे लोक स्पर्धक असल्याचे दिसत आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि किर्तनकार शिवलीला पाटील यांच्यात यावेळी इंदुरीकर महाराजांवरून वाद झाला आहे.

तृप्ती देसाई, शिवलीला पाटील, सुरेखा कुडची आणि मीनल शाह बिग बॉसच्या घरात छान गप्पा मारत होत्या. त्यावेळी इंदुरीकर महाराज यांचा विषय निघाला आणि शिवलीला म्हणाल्या, तृप्ती यांनी इंदुरीकर महाराजाच्यांविरोधात केस केली होती. यावर उत्तर देत इंदुरीकर महाराजांची किर्तन महिलांचा अपमान करणारी असतात. आमच्या आंदोलनानंतर युट्यूबवरून जवळपास 80 टक्के किर्तनाचे व्हिडिओ डिलीट केली. कारण तेव्हा आम्ही मोहीमच सुरु केली होती, त्यावेळी संपूर्ण जिल्हा माझ्या विरोधात असल्याचे तृप्ती म्हणाल्या.

तृप्ती पुढे म्हणाल्या, इंदुरीकर महाराज महिलांनी फेटा घालू नये, असे म्हणाले होते. महिलांनी फेटा घातला, तर आम्ही काय गाऊन घालायचा का? त्यांनी केलेले हे विधान चुकीचे होते. शिवलीला देखील किर्तनाचे अनेक कार्यक्रम करताना फेटा घालतात, अनेक ठिकाणी फेटा घातला जातो त्यात चुकीचे असे काय? हे ऐकल्यानंतर शिवलीला म्हणाल्या, मी फक्त किर्तन करताना फेटा घालते, इतरवेळी नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!