राजकीय हेतूने मुंबै बँकेच्या चौकशीचे आदेश, आता राष्ट्रवादीशी संबंधित बँकांचे घोटाळे बाहेर काढणार – दरेकर
मुंबई
प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी सहकार विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच याचा चौकशी अहवाल तीन महिन्यात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे प्रवीण दरेकर अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र बँकेच्या चौकशीचे आदेश हे केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी दिले असल्यााच आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई (मुंबै) जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
दरेकर म्हणाले की, गेली अनेक वर्ष बँकेचा कारभार सुव्यवस्थितपणे असून अनेक वेळा मुंबै बँकेला सहकार खात्याच्या ऑॅडिटर्स कडून ’अ’ वर्ग देण्यात आला आहे. आताही मुंबई बँकेला वर्ग ’अ’ देण्यात आला असून बँक सुव्यवस्थित आहे. मात्र केवळ राजकीय सुडापोटी मुंबै बँकेला वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला. त्यांनी गुरुवारी या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हे आरोप केले आहेत. गेल्या पाच वर्षात मुंबै बँकेच्या कारभारामध्ये अनियमितता आहे. त्यामुळे बँकेच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. मात्र सहकार विभागाने घेतलेल्या या निर्णयाबाबत अद्यापही मुंबै बँकेला नोटीस मिळालेली नसल्याचेही दरेकर यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग-ेसकडे असलेल्या बँकेचे घोटाळे बाहेर काढणार-
आर्थिक संस्थेबाबत राजकारण करणे हे चुकीचे आहे. प्रसारमाध्यमांमध्ये बँकेबाबत विरोधाभास दर्शवणार्या बातम्या आल्यास त्याचा आर्थिक फटका बँका आणि सहकारी संस्थांना बसत असतो. त्यामुळे बँका किंवा सहकारी संस्था बाबत राजकारण करणे चुकीच आहे. मात्र मुंबै बँकेवर सुरू असलेल्या सुडाचे राजकारण पाहता आम्हीही राष्ट्रवादी काँग-ेसच्या नियंत्रणात असलेल्या सहकारी बँका आणि सहकारी संस्थेचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशाराच त्यांनाी राष्ट्रवादी काँग-ेसला इशारा दिला आहे. तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात आपल्याकडे अनेक पुरावे आहेत. लवकरच या बँकेतील घोटाळा आपण बाहेर काढू असही पत्रकार परिषदेतून प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.
बरबटलेल्या हाताने राज्य सरकार काय चौकशी करणार?
राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आणि नेत्यांवर भ-ष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. सरकारचे हात स्वत: भ-ष्टाचारात बरबटलेले आहेत. अशा बरबटलेल्या हातांनी राज्य सरकार मुंबई बँके संदर्भात काय चौकशी करणार ? असा सवालही प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.