चर्चा सव्वा रुपयांची! ‘मुद्दा पैशांचा नाही, स्वाभिमानाचा आहे‘; चंद्रकांत पाटलांच्या सल्ल्यावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर
मुंबई
राज्याच्या राजकारणात सध्या चर्चा आहे, सव्वा रुपयांची. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा अब-ू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर संजय राऊतांनी अब-ू नुकसानीच्या दाव्याची किंमत वाढवावी असा सल्ला राऊतांना दिला होता. अशातच आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी स्वाभिमान आणि सन्मानाला किंमत नसते, मग तो एक हजार कोटींचा असो किंवा सव्वा रुपयांचा. प्रश्न स्वाभिमानाचा आहे, त्यामुळे किंमत वाढवून घ्या, या चंद्रकांत पाटलांच्या मागणीला काहीच अर्थ नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. यासोबतच माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
संजय राऊत म्हणाले की, ‘मुद्दा पैशांचा नाही, स्वाभिमानाचा आहे. अब-ूची आणि स्वाभिमानाची काही किंमत नसते. मग 500 कोटींचा अब-ू नुकसानीचा दावा ठोका, 1000 कोटींचा किंवा 1 रुपयांचा दावा ठोका. त्यांच्याकडे खूप पैसे आहेत. त्यांच्या पैशांची आम्हाला गरज नाही. त्यांच्या पैशांवर आमचं घर चालत नाही. आम्ही सामान्य लोक आहोत. आमचं कुटुंब स्वत: कमावून पोट भरतं, ते त्यांनाही माहीत आहे. प्रत्येकवेळी पैशांचा मुद्दा नसतो, त्यांना प्रत्येक ठिकाणी पैसे दिसतात. तो पेसैवाल्यांचा पक्ष आहे.‘
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
संजय राऊतांनी माझ्यावरील मानहानीची रक्कम वाढवावी. माझी किंमत सव्वा रुपया नक्कीच नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आपल्या संस्कृतीत एकमेकांना चिमटे घेतले जातात, मात्र जखम होत नाही. माझी किंमत त्यांनी ठरवावी मात्र सव्वा रुपया नक्की नाही. मला संधी मिळेल त्यावेळी सातत्याने बोलणारे, सातत्याने लिहिणारे असा अवार्ड द्यायचा झाला तर मी संजय राऊतांना देईल. शिवसेनेचं दुसरं कुणी काही बोलत नाही. फक्त संजय राऊतच बोलतात. त्यासाठी तयारी करावी लागते, असंही ते म्हणाले.
चंद्रकांत पाटलांची किंमत सव्वा रुपयाच, संजय राऊतांचा निशाणा
पीएमसी बँक घोटाळ्यातले पैसे राऊत कुटुंबाला प्राप्त झाले असा आरोप करणार्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना थेट कोर्टात खेचण्याची तयारी संजय राऊत यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांचं याबाबतचं पत्र आज सामना वृत्तपत्रात छापून आलं आहे. पण पुढच्या चार दिवसात चंद्रकांत पाटील यांना माझी कायदेशीर नोटीस जाईल. मी नोकरदार माणूस आहे, मध्यमर्गीय. घोटाळे करत बसलो असतो तर राजकारणात टिकलो नसतो असं म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचे आरोप फेटाळले आहेत. शिवाय लोक शंभर कोटींचा दावा करतात, पन्नास कोटींचा करतात. पण यांची एवढी लायकी नाही. मी यांच्यावर सव्वा रुपये अब-ुनुकसानीचा दावा करणार आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांना कोर्टात खेचण्याचा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला होता.