क्रेडिट, डेबिट कार्ड पेमेंट; बँक-मोबाईल वॉलेटसाठी नवे नियम

मुंबई

क्रेडिट, डेबिट कार्ड पेमेंटमध्ये 1 ऑॅक्टोबरपासून बदल होणार आहे. रिझर्व्ह बॅक ऑॅफ इंडियाकडून पेमेंट सिस्टीममध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत. ऑॅटो डेबिट पेमेंट सिस्टीम अधिक सुरक्षित करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे हे नवे नियम लागू होणार आहेत.

बँक, मोबाईल वॉलेटसाठी नवे नियम

दरम्यान, बँक, मोबाईल वॉलेटसाठी नवे नियम होणार लागू होणार आहेत. वॉलेटमधून पैसे जाण्याआधी ग-ाहकांची परवानगी सक्तीची करण्यात आली आहे. यापुढे वॉलेटमधून थेट पैसे जाणार नाहीत, असे धोरण आखले गेले आहे. ग-ाहकांच्या परवानगीसाठी वॉलेटला एसएमएस पाठवावा लागणार आहे. त्यानंतर पैसे खात्यातून कट होतील. याचे नवे नियम 1 ऑॅक्टोबरपासून लागू होणार आहेत.

ऑॅटो डेबिट पेमेंट सिस्टीम अधिक सुरक्षित

ऑॅटो डेबिट पेमेंट सिस्टीम अधिक सुरक्षित करण्यासाठी रिझर्व्ह बॅक ऑॅफ इंडियाने पेमेंट सिस्टीममध्ये मोठे बदल करत आहे. या नव्या नियमांचा बँक आणि मोबाईल वॉलेटवर थेट परिणाम होणार आहे. कारण आता यापुढे वॉलेटमधून थेट पैसे जाणार नाहीत तर वॉलेटमधून पैसे जाण्याआधी ग-ाहकांची परवानगी बंधणकारक असणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारी फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे.

पुढील महिन्यापासून, मोबाईल, युटिलिटी आणि इतर बिलांसाठी ऑॅटो-पेमेंटचे नियम बदलण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑॅफ इंडियाने (आरबीआय) आधी सांगितले होते की, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युनिफाइड पेमेंटस इंटरफेस (यूपीआय) किंवा इतर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुुमेंटस (पीपीआय) वापरून वारंवार होणारे व्यवहार 1 ऑॅक्टोबरपासून अतिरिक्त फॅक्टर ऑॅथेंटिकेशनची (अऋअ) आवश्यकता असेल. नवीन नियमांनुसार, बँकांना ग-ाहकांना आवर्ती देयकाबद्दल आगाऊ माहिती देणे आवश्यक असेल आणि ग-ाहकांकडून होकार मिळाल्यानंतर व्यवहार केले जातील. या नियमाचा नेटफ्लिक्स, आरूेप प्राइम, डिस्ने हॉटस्टारसह विविध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी तुमच्या मासिक सदस्यता शुल्कावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!