मोठी बातमी: आरसिबी मध्ये होणार भूकंप! विराट कोहलीची कर्णधारपदावरुन हकालपट्टी होणार?
मुंबई,
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. आरसीबी कॅप्टन विराट कोहलीला आयपीएल स्पर्धा सुरू असतानाच कर्णधारपदावरुन हटवले जाऊ शकते. एका माजी भारतीय क्रिकेटपटूनं ही माहिती दिली आहे.
अबू धाबीमध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये आरसीबीचा मोठा पराभव झाला. या मोठ्या पराभवानंतर विराटला स्पर्धेच्या दरम्यानच कर्णधारपदावरुन हटवले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. या आयपीएल स्पर्धेतनंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीनं यापूर्वीच जाहीर केला आहे. आपण पुढील आयपीएलपासून एक बॅटसमन म्हणून आरसीबीकडून खेळणार असल्याचं विराटनं जाहीर केलं आहे.
पहिल्या बॅटीगसाठी उतरलेली आरसीबीची टीम कोलकाता विरुद्ध फक्त 92 रन वर ऑॅल आऊट झाली. विराट या मॅचमध्ये फक्त 5 रन काढून आऊट झाला. त्याला प्रसिद्ध कृष्णानं आऊट केलं. कृष्णाच्या आतमध्ये येणार्या बॉलवर विराट फसला. अंपायरनं आऊट दिल्यानंतर विराटनं रिव्ह्यू देखील घेतला, पण त्याचा काही फायदा झाला नाही.
’क्रिकेट नेक्स्ट’ मधील वृत्तानुसार विराट कोहलीनं अचानक कॅप्टनसी सोडणार असल्याचं जाहीर केल्यानं टीमला त्याचा फटक बसला आहे. त्यामुळे टीम अशांत वाटत आहे. त्यामुळे विराटला ही स्पर्धा सुरू असतानाच कॅप्टनसीवरुन हटवले जाऊ शकते, असं मत एका माजी क्रिकेटपटूनं नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केलं आहे.
’विराट केकेआर विरुद्ध संघर्ष करत होता. त्याचा तो खेळ पाहून त्याला कॅप्टनसीच्या पदावरुन हटवले जाऊ शकते. यापूर्वी देखील हा प्रकार आयपीएल टीमच्या बाबतीत घडला आहे. केकेआरचा दिनेश कार्तिक आणि सनरायझर्स हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर हे याचं प्रमुख उदाहरण आहे. कार्तिकनं स्वत:हून कॅप्टनसी सोडली तर वॉर्नरला हटवण्यात आले. हीच गोष्ट आरसीबीमध्ये देखील होऊ शकते. केकेआर विरुद्ध आरसीबी मॅच पाहिल्यानंतर मला असं वाटत आहे. आणखी एका खराब खेळानंतर आरसीबी कॅप्टन बदलण्याची शक्यता आहे.’ असं या क्रिकेटपटूनं सांगितलं.