झी आणि सोनी पिक्चर्स चे विलीनीकरण; तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सचा करार जाहीर

मुंबई

झी एन्टरटेनमेन्ट बोर्डने सोनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. या दोन कंपन्यांमध्ये झालेली ही मेगा डील तब्बल 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजे 11,615 कोटी रुपयांची असून यामध्ये सोनी पिक्चर्सकडे मेजॉरिटी शेअर्स (52.93 टक्के) असणार आहेत. या दोन कंपन्यांचे विलीनीकरण झाल्यानंतर पुनित गोयंका हे पुढील पाच वर्षांसाठी एमडी आणि सीईओ असतील.

झी एन्टरटेनमेन्टच्या झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये या कराराला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता झी एन्टरटेनमेन्ट आणि सोनी इंडियाच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मध्ये सोनी इंडियाचे प्रमोटर देखील कंपनीमध्ये गुंतवणूक करु शकणार आहेत. या विलीनीकरणानंतर सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे मेजॉरिटी म्हणजे 52.93 टक्के शेअर्स तर झी एन्टरटेनमेन्टकडे 47.07 टक्के शेअर्स असणार आहेत.

या विलीनीकरणानंतर आता पुनित गोयंका हे पुढच्या पाच वर्षांसाठी एमडी आणि सीईओ असतील अशी घोषणा करण्यात आली आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे या विलीनीकरण झालेल्या कंपनीचे मेजॉरिटी डायरेक्टर्स नियुक्त करण्याचे अधिकार असतील.

या विलीनीकरणाच्या करारानुसार आता झी एन्टरटेनमेन्ट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क या दोन्ही कंपन्यांना आपल्या-आपल्या लायनर नेटवर्क, डिजिटल अ‍ॅसेटस, प्रोडक्शन व्यवहार आणि प्राईम लायब-री एकत्रित करावी लागणार आहेत. या करारानुसार प्रमोटर्स कंपन्यांना या कंपनीमधील आपला सध्याचा 4 टक्क्यांचा हिस्सा हा वाढवून 20 टक्क्यांवर नेण्याचे स्वातंत्र्य असेल. या विलीनीकरणाचा दोन्ही कंपन्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे असं मत बोर्डने व्यक्त केलं आहे. या दोन्ही मोठ्या कंपन्या एकत्रित आल्याने एक नवीन उर्जा मिळेल आणि शेअर होल्डर्सना त्याचा लाभ होईल असंही बोर्डच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!