पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
मुंबई
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती भारतात गेल्या 24 तासात 96,46,778 मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत एकूण 81.85 कोटींपेक्षा अधिक मात्रा (81,85,13,827) देण्यात आल्या आहेत. एकूण 80,35,135 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 34,469 रुग्ण कोविडमुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,27,49,574 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे होण्याचा दर आता 97.75म.झाला आहे.
केंद्र आणि राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 86 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद आता होत आहे. गेल्या 24 तासात 26,115 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,09,575 आहे.उपचाराधीन रुग्ण, आतापर्यंतच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.92म आहेत.
देशभरात चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु आहे. देशात गेल्या 24 तासात एकूण 14,13,951 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 55.50 कोटींहून अधिक (55,50,35,717) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.08म असून गेले 88 दिवस 3म पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.85म इतका आहे.दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले 22 दिवस 3म पेक्षा कमी आणि 105 दिवस 5म पेक्षा कमी आहे.
इतर अपडेटस:-
देशव्यापी लसीकरण अभियानाचा भाग म्हणून केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा पुरवत आहे. कोविड-19 लसीकरण अभियानाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्यात केंद्र सरकार, देशातल्या लस उत्पादकांकडून उत्पादित 75म लसी खरेदी करून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवत आहे.केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्त्रोताद्वारे 79.74 कोटींपेक्षा अधिक (79,74,26,335) लसींच्या मात्रा राज्येकेन्द्र शासित प्रदेशांना पुरवल्या आहेत आणि 33 लाख मात्रा (33,00,000) पुरवठ्याच्या मार्गावर आहेत.