बीसीसीआयकडून भारताच्या व्यस्त घरगुती हंगाम 2021-22 च्या कार्यक्रमाची घोषणा
मुंबई,
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (बीसीसीआय) चे सचिव जय शाहनी सोमवारी भारतीय पुरुष संघाच्या 2021-22 च्या घरगुती हंगामातील कार्यक्रमाची घोषणा केली. भारताचा घरगुती हंगाम आयसीसी क्रिकेट विश्व कपच्या अंतिम सामन्यानंतर तीन दिवसाने 17 नोव्हेंबर पासून सुरु होईल.
बीसीसीआयच्या शीर्ष परिषदेने सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये या कार्यक्रमाला मंजूरी दिली. भारत या दरम्यान चार कसोटी, तीन एकदिवशीय आणि 14 टि-20 सामन्यांची यजमानी करणार आहे.
न्यूझीलँड व श्रीलंकेचे संघ दोन कसोटी आणि तीन तीन सामन्यांच्या टि-20 मालिकेसाठी अनुक्रमे नोव्हेंबर 2021 आणि मार्च 2022 मध्ये भारताचा दौरा करतील. वेस्टइंडिजचा संघ तीन एकदिवशीय आणि तीन टि-20 सामन्यांसाठी फेब-ुवारी 2022 मध्ये भारताचा दौरा करेल. घरगुती हंगामाच्या दरम्यान भारतीय संघ डिसेंबर-जानेवारीमध्ये सर्व प्रारुपच्या मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा दौरा करेल. याच बरोबर भारत जून 2022 मध्ये पाच सामन्यांच्या टि-20 मालिकेसाठी दक्षिण अफ्रिका संघाची यजमानी करेल.
कानपूर आणि मुंबईत न्यूझीलँडच्या विरुध्द दोन कसोटी सामन्यासाठी वेन्यूच्या रुपात पाहिले जात आहे तर बेंगळूरु आणि मोहालाली श्रीलंंकेसाठी दोन कसोटीची यजमानी करेल. दोनीही मालिका विश्व कसोटी चॅम्पियनशिप 2021-23 साईकिलच्या हिस्सा असतील.
भारत विरुध्द न्यूझीलँडमध्ये पहिल्या टि-20 सामना 17 नोव्हेंबरला जयपूरमध्ये, दुसरा टि-20 19 नोव्हेंबरला रांचीमध्ये. तिसरा टि-20 21 नोव्हेंबरला कोलकातामध्ये, पहिला कसोटी सामना 25 ते 29 नोव्हेंबर दरम्यान कानपूरमध्ये, दुसरा कसोटी 3 ते 7 डिसेंबर 2021ला मुंबईत.
भारत विरुध्द वेस्टइंडिजमधील पहिला एकदिवशीय सामना 6 फेब-ुवारी 2022ला अहमदाबादमध्ये, दुसरा 9 फेब-ुवारी 2022 ला जयपूरमध्ये, तिसरा एकदिवशीय सामना 12 फेब-ुवारीला कोलकातामध्ये. पहिला टि-20 सामना 15 फेब-ुवारीला कटकमध्ये, दुसरा टि-20 सामना 18 फेब-ुवारीला विशाखापट्टणममध्ये, तिसरा टि-20 सामना 20 फेब-ुवारीला त्रिवेेंद्रममध्ये होईल.