जिल्हा मल्लखांब व योगासन असोसिएशन तर्फे खेलो इंडिया योगासन स्पर्धेकरिता निवड चाचणी स्पर्धा
मुंबई
खेलो इंडिया निवड प्रक्रियेसाठी योगासन स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यातून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संघाची निवड केली जाणार आहे. मुला-मुलींच्या स्वतंत्र तीन वयोगटात होणार्या या स्पर्धेतून प्रत्येक गटातील चौदा खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संघात निवड केली जाणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने होणार्या या स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडूंकडून योगासनांच्या विविध पाच स्पर्धा प्रकारांचे व्हिडिओ मागविण्यात आले आहेत. भारत सरकारने योगासनांना खेळाचा दर्जा दिल्यानंतर राष्ट्रीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने देशभरातील योगासन खेळाडूंसाठी विविध स्पधार्ंचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनने राज्यातील योगासन स्पधार्ंचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या स्पर्धेत 9 ते 14, 14 ते 18 व 18 वषार्ंपुढील मुलं-मुलींचे स्वतंत्र तीन गट असतील. प्रत्येक गटात सहभागी स्पर्धकांचे वय 31 डिसेंबर 2021 पयर्ंतचे गृहीत धरले जाणार आहे. पारंपरिक योगासन (वैयक्तिक), कलात्मक योगासन (वैयक्तिक व दुहेरी), तालात्मक योगासन (दुहेरी) व सांघिक कलात्मक (पाच खेळाडू) अशा पाच प्रकारामध्ये होणार्या या स्पर्धेतून प्रत्येक गटातील प्रत्येकी चौदा खेळाडूंची जिल्हास्तरावरून राज्य पातळीवर निवड करण्यात येणार आहे. 23 सप्टेंबर पयर्ंत या स्पर्धेसाठी नावे नोंदणी करता येणार असून अधिकाधिक योगासन खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा मल्लखांब व योगासन असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दयानंद भक्त, सचिव प्रा डॉ भिकूलाल सले, प्रा डॉ रत्नाकर कुलकर्णी, प्रा डॉ शाम काबुलीवाले, प्रा गजानन जगताप आदी पदाधिकार्यांनी केले. जालना जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्राचार्य डॉ दयानंद भक्त – 9823190694, प्रा डॉ भिकूलाल सले – 9421425393, प्रा डॉ शाम काबुलीवाले – 9423748313 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.