राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, संपूर्ण मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी

मुंबई,

राज्यात पुढील तीन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचा क्षेत्रांमुळे पाऊस लांबला आहे. सप्टेंबर मध्यानंतर मान्सून प्रामुख्याने माघारी फिरत असतो मात्र यावर्षी सप्टेंबर अखेर उजाडणार असल्याने राज्यात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. देशाच्या पूर्व व मध्य भागात आजपासून पावसाचे प्रमाण वाढणार आहे. प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळेल. दरम्यान, राज्यात देखील सर्वत्र पावसाचा अंदाज आहे.

कोकणात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज आणि उद्यासाठी कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात साधारण 15 मिमी ते 115 मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, वार्‍यांचा वेग देखील अधिक राहण्याचा अंदाज आहे.

मुंबईबद्दल बोलायचं झालं तर आजपासून पुढील तीन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज आहे. आज ऊन-पावसाचा खेळ बघायला मिळू शकतो. तर उद्या आणि परवा काही ठिकाणी कालांतराने मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. दरम्यान, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता कमीच असल्याचंही बोललं जातंय.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!