कंगना रनौतकडून न्यायाधीश बदलण्याची मागणी, अंधेरी कोर्टातील न्यायाधीशांवर कंगनाचे आरोप

मुंबई,

लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब-ुनुकसानी प्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत आज अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात हजर राहिली. आता या प्रकरणाची सुनावणी 15 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान आजच्या सुनावणीनंतर कंगना रनौतकडून न्यायाधीश बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. अंधेरी कोर्टातील न्यायाधीशांवर कंगनाने आरोप केले आहेत. आजच्या सुनावणीत कंगना कोर्टापुढे हजर झाली नाही तर तिच्या नावे अटक वॉरंट जारी केला जाईल, अशी तंबी दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाला दिली होती. या खटल्याविरोधात कंगनानं दाखल केलेली याचिका नुकतीत मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती.

जावेद अख्तर यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या मानहानी प्रकरणात कंगना आज अंधेरी कोर्टात पोहोचली. कंगनानं जावेद अख्तर यांच्यावर खंडणी आणि धमकी दिल्याचा आरोप केला. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी सांगितलं की, जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावून धमकी दिली. मात्र कंगना त्यावेळी काही बोलली नाही. मात्र आता तिनं आपल्या तक्रारीत हे नमूद केलं आहे. वकिलांनी सांगितलं की, कंगनानं म्हटलंय की, जर जावेद अख्तर यांना या प्रकरणाशी काही देणं घेणं नव्हतं तर ते हृतिक- कंगना प्रकरणात का आले. कंगना आणि रंगोलीला आपल्या घरी का बोलावलं? असा सवालही वकिलांनी केला.

अंधेरी कोर्टाच्या न्यायाधीशांवर कंगनानं गंभीर आरोप केले आहेत. न्यायाधीश वारंवार कंगनाला कोर्टात का बोलावत आहेत. वॉरंट जारी करण्याची धमकी दोन वेळा दिली गेली. तिचे वकील प्रत्येक सुनावणीला हजर होते. कंगना देखील याआधी कोर्टात आली होती. मग आता परत तिला बोलवायची गरज काय? असं तिच्या वकिलांनी सांगितलं. या न्यायाधीशांवर विश्वास नाही, त्यांना बदलण्याची मागणी कंगनानं वकिलांमार्फत केली आहे.

आजच्या सुनावणीत कंगना कोर्टापुढे हजर झाली नाही तर तिच्या नावे अटक वॉरंट जारी केला जाईल, अशी तंबी दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाला दिली होती. या खटल्याविरोधात कंगनानं दाखल केलेली याचिका नुकतीत मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. तसेच दंडाधिकारी न्यायालयाची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळाही दिला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीत कंगनाला दंडाधिकारी न्यायालयात हजर रहाणं बंधनकारक होतं.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!