भाजप खासदार बाबूल सुप्रियो यांनी सोडली कमळाची साथ, ’तृणमूल’मध्ये प्रवेश
मुंबई,
भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी ममता बनर्जी यांच्या तृणमूल काँग-ेस (टीएमसी)मध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव आणि लोकसभा खासदार अभिषेक बनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओ ब-ायन यांनी बाबुल सुप्रियो यांना पक्षाचं सदस्यत्व दिलं आणि स्वागत केलं. आसनसोल लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या सुप्रियो यांच्या तृणमूल प्रवेशानं पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.
बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला होता. बाबुल सुप्रियो आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले होते की, राजकरणात न राहता देखील ते सामाजिक कार्य करू शकतात. ते कोणत्याही पक्षात जाणर नाहीत असंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता त्यांच्या टीएमसी प्रवेश झाल्यानं भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातो आहे.
आसनसोल लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी जुलै महिन्यात राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मला कोणत्या पक्षाने बोलावलेले नाही. मी कुठेही जाणार नाही. समाजसेवा करण्यासाठी राजकरणात असण्याची आवश्यकता नाही.‘ निवडणुकीअगोदरच पक्षाबरोबर माझे काही मतभेद होते, त्या गोष्टी निवडणुकीच्या अगोदरच सर्वांसमोर उघड झाल्या होत्या. पराभवाची जबाबदारी घेत आहे, परंतु दुसरे नेते देखील जबाबदार असल्याचे बाबुल यांनी पोस्टमध्ये म्हटले होते. खासदार पदाचा राजीनामा देऊन, मी माझे शासकीय निवसस्थान महिनाभरात सोडेल, असंही बाबुल सुप्रियो म्हणाले होते.
बाबुल सुप्रियो म्हणाले होते की, एकदा विमान प्रवास करताना रामदेव बाबांशी माझी चर्चा झाली. पश्चिम बंगालची निवडणूक भाजप गंभीरपणे घेत आहे. पण त्यांना एकही जागा मिळणार नाही, असं मी ऐकलं. तेव्हा मला खूप वाईट वाटले. तेव्हा असा विचार आला की जो बंगाली श्यामाप्रसाद मुखर्जी आणि अटल बिहारी वाजपेयींवर एवढं प्रेम करतो, तो भाजपला का निवडणुकीत एकही जागा देऊ शकत नाही, असे कसे होऊ शकते. विशेषत: जेव्हा नरेंद्र मोदीच पुढील पंतप्रधान असेल असं सर्व भारतीयांनी ठरवलेलं असताना बंगालने वेगळा विचार का करावा? असं विचार आला.