मुख्यमंत्र्यांच्या ’आजी-माजी-भावी’ या विधानामागचा अर्थ संजय राऊत यांनी सांगितला की…
मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात केलेल्या विधानावरून राज्यात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. आता शिवसेना-भाजपची युती संकेत मिळत आहे. त्यानंतर भाजपकडूनही प्रतिक्रिया आली. त्यामुळे तर्क-वितर्क सुरू झालेत. आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, असा उल्लेख केल्यानंतर शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यानंतर आता शिवसेना नेत संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त दिली. या विधानामागे नक्की काय अर्थ याचाही त्यांनी उलगडा केला.
हे सरकार पडेल, या भ-मात कुणी राहू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या त्या विधानामागचा नेमका अर्थ कोणता, याविषयी भाष्य त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ज्यांना पतंग उडवायचीये, त्यांनी उडवावी. कुणाची पतंग कधी कापायची, हे आम्हाला समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक भाषण करण्याची स्टाईल आहे. त्यापद्धतीने त्यांनी हे भाषण केले आहे. त्यांनी असे कुठेही म्हटलेले नाही की, नवीन आघाडी होईल. आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. त्यांनी स्पष्ट सांगितले की, ज्यांना भावी सहकारी व्हायचंय, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. राजकारणात तशा हालचाली दिसत आहेत, असे राऊत म्हणाले.
हे सरकार पाच वर्ष चालवायची कमिटमेंट आहे. शिवसेना शब्दांची पक्की असते. शिवसेना कधी विश्वासघात करत नाही, शिवसेना पाठीत खंजीर खुपसत नाही. शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही. ही शिवसेनेची खासियत आहे. आम्ही सगळे त्याच मार्गाने चालतो. हे सरकार पडेल, या भ-मात कुणी राहू नये, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.
दरम्यान, ज्या पक्षातल्या लोकांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढतात. ही जी नवीन संस्कृती समोर आली आहे, अशा पक्षांशी आम्ही हातमिळवणी कशी करू शकतो का, असा प्रतिप्रश्न राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.