दहशतवादी जान मोहम्मदचा हॅन्डलर झाकीर हुसेन शेख आहे तरी कोण?
मुंबई,
चार दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आता मुंबईत काल रात्री एका दहशतवाद्याला अटक करण्यात यश आलं आहे. झाकीर हुसेन शेख असं या दहशतवाद्याचं नाव असून तो मुंबईचा रहिवासी आहे. झाकीर हुसेन शेख हा दाऊदचा भाऊ अनिस इब-ाहिमच्या संपर्कात होता. झाकीर शेख हा जान मोहम्मदचा हॅन्डलर असून त्यानेच जान मोहम्मदला हत्यारं आणि विस्फोटकांची डिलिव्हरी करण्यास सांगितलं होतं.
जान मोहम्मदला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर मुंबई एटीएस झाकीर हुसेन शेखच्या मागावर होते. त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी झाकीर शेख हा मुंब-ामध्ये सुरक्षित जागा शोधत होता. त्याने त्याच्या पत्नीला वांद्रे येथील एका नातेवाईकाकडे ठेवलं होतं. याची माहिती मिळताच एटीएसने सापळा रचला. झाकीरच्या पत्नीच्या मदतीने त्याला एक फोन केला. झाकीरला जोगेश्वरी परिसरात भेटायला बोलावलं आणि ताब्यात घेतलं.
कोण आहे झाकीर हुसेन शेख?
झाकीर हुसेन शेखला जोगेश्वरी परिसरातून एटीएसने ताब्यात घेतल्याचं समजतंय. झाकीर हा धारावीतील जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालीया याचा हॅन्डलर होता. झाकीर शेख हा अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. झाकीरचा भाऊ शाकीर शेख हा पाकिस्तानमध्ये असून तो दाऊदचा भाऊ अनिस इब-ाहिमचा उजवा हात आहे. शाकीरच्या माध्यमातून झाकीर हा अनिस इब-ाहिमच्या सातत्याने संपर्कात होता. त्यामुळे मुंबईच्या क्राईम ब-ॅन्चच्या रडारवर तो सुरुवातीपासूनच होता.
झाकीरने अनिस इब-ाहिमच्या सांगण्यावरुनच जान मोहम्मदला या दहशतवादी हल्ल्याच्या योजनेमध्ये सामिल केलं होतं. झाकीर अंडरवर्ल्डमधील स्लीपर सेल पद्धतीने काम करत असून जान मोहम्मदला तो लॉजिस्टिक सपोर्ट देत होता. झाकीरच्या सांगण्यावरुनच जान मोहम्मद दिल्लीसाठी रवाना झाला होता.
झाकीरला एका खंडणी प्रकरणात या आधी अॅन्टी एक्टॉर्शन सेलने अटक केली होती. आता त्याला मुंबईच्या शिवडी स्पेशल कोर्टमध्ये हजर केलं जाणार आहे. तिथून त्याला कस्टडीत घेऊन पुढच्या चौकशीसाठी दिल्लीला रवाना होणार आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चार दिवसांपूर्वी सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून या दहशतवाद्यांनी तयारी सुरू केली होती. यामधील दोन दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेतलं आहे. तसेच अनीस इब-ाहिमचा जवळचा हस्तगत जान मोहम्मद शेख हा या अतिरेक्यांना लागणार्या पैशापासून ते इतर सर्व प्रकारची मदत पोहचवत होता.