मुंबईची लोकल ठरली ’लाईफलाईन’; प्रत्यारोपणासाठी रेल्वे मार्गाने अवयव रूग्णालयात

मुंबई,

यापूर्वी एअर अ‍ॅम्ब्युलन्स किंवा ग-ीन कॉरिडोरच्या माध्यमातून दान केलेले अवयव एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यात आल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मात्र लोकल ट्रेनमधून, ते देखील मुंबई लोकलमधून दान केलेले अवयव रूग्णालयापर्यंत पोहोचवले असल्याचं तुम्ही ऐकलंय का?

आतापर्यंत ऍम्ब्युलन्सने ब-ेन डेड व्यक्तीचे किडनी, हार्ट नेण्यात आलं. मात्र, मुंबईची लाईफ लाईन ओळखल्या जाणार्‍या मुंबई लोकलमधून एका रूग्णासाठी लिव्हर आणि किडनी एका रूग्णालयातून दुसर्‍या रूग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. कल्याण ते दादर असा एक तास सात मिनिटांचा प्रवास करून हे अवयव सुरक्षितरित्या पोहचवण्याचं काम रेल्वेने केलं. मध्य रेल्वेने आपल्या टिवटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

कल्याणच्या फोर्टीस रूग्णालयातून लिव्हर आणि किडनी हे अवयव परेलच्या फोर्टीस रूग्णालयापर्यंत हा प्रवास होत्या. 67 मिनिटांमध्ये हा प्रवास करणं शक्य झालं आहे. मुंबईतील हे 28वं अवयवदान होतं.

मध्य रेल्वेच्या अधिकृत टिवटर हँडलवरून यासंदर्भात टिवट करण्यात आलंय. यामध्ये नमूद केल्याप्रमाणे, मध्य रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने ब-ेनडेड रूग्णाचे दान केलेले लिव्हर आणि किडनी हे अवयव जलद आणि सुरक्षित माध्यम असलेल्या मुंबई लोकल ट्रेन ‘मुंबईची लाईफलाइन‘द्वारे पोहोचवण्यात आले. कल्याणमधील फोर्टीस हॉस्पिटल ते परळच्या ग्लोबल हॉस्पिटलपर्यंतचा हा प्रवास होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!