मुंबईत आज 446 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू

मुंबई,

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे, मात्र काही दिवसांपासून वाढलेली आकडेवारी चिंतेचा विषय बनत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 446 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 431 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,13,605 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 44 हजार 649 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली

मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4654 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1279 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील सध्या 39 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अ‍ॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शुन्य आहेत.

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. देशात चार दिवसांनी पुन्हा एकदा दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून आल. गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30,570 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 431 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 38,303 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!