वीजदर सवलत मिळणार्या यंत्रमाग घटकांना ऑॅनलाईन अर्ज करण्यास 2 ऑॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई,
महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत राज्यातील वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली असून ही सवलत मिळणार्या यंत्रमाग घटकांना ऑॅनलाईन अर्ज करण्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 2 ऑॅक्टोबरपर्यंत सर्व संबंधित यंत्रमाग घटकांनी ऑॅनलाईन आणि 27 अश्वशक्तीखालील घटकांनी ऑॅफलाईन अर्ज करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आलेली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणार्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या हीींिीं://ुुु.वळीींशुारह.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर ऑॅनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक 28 फेब-ुवारी 2021 पर्यंत देण्यात आलेली होती, त्यानंतर यंत्रमाग घटकांच्या संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सदर मुदत 31 मे 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली होती. मात्र, या मुदतीत देखील बहुतांश यंत्रमाग घटकांनी नोंदणी केल्याचे दिसून आले नाही.
सर्व प्रकारच्या यंत्रमाग घटकांना ऑॅनलाईन तसेच 25 फेब-ुवारी 2021 च्या शासन निर्णयान्वये 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना ऑॅनलाईन किंवा ऑॅफलाईन यापैकी कोणत्याही प्रकाराने नोंदणी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. ही अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक 2 सप्टेंबर 2021 च्या शासन पत्रानुसार एक महिन्याची म्हणजे 2 ऑॅक्टोबर 2021 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधित यंत्रमाग घटकांनी अर्ज केला नाही तर त्यांची वीज सवलत जोपर्यंत ते सदर नोंदणी करीत नाहीत तो पर्यंत बंद करण्यात यावी, असे निर्देश शासनाने दिलेले आहेत, त्यामुळे सर्व संबंधित यंत्रमाग घटकांनी विहित मुदतीच्या आत आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑॅनलाईन किंवा ऑॅफलाईन (27 अश्वशक्तीखालील घटक) नोंदणी करणे आवश्यक आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.