केंद्राने केंद्राची कामे करावीत, राज्याच्या कर लावण्याच्या अधिकारावर गदा आणू नका; अजित पवारांचा टोला

मुंबई,

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीसटीच्या मुद्यांवरुन केंद्र सरकावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्याचा अपेक्षित जीसटी परतावा दिला नाही. जीएसटी कायदा करताना केंद्रानं दिलेली आश्वासनं पाळावीत, केंद्राने केंद्राचं काम कराव, राज्याच्या अधिकारात गदा आणू नये असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला.

पेट्रोल आणि डिझेलवर लागू करण्यात येणार्‍या करांच्या बाबतीत सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली लखनौमध्ये होणार्‍या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य सरकारची भुमिका ठरलेली

पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लावून एक प्रकारचा टॅक्स लावायचा अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या सुरु सुरु आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणी काही बोललेलं नाही. परंतु, उद्या जीएसटी कौन्सिलच्या परिषदेत चर्चा झाली तर राज्य सरकारची भूमिका काय मांडायची? वित्त विभागाने काय भूमिका मांडायची? ही स्ट्रॅटेजी ठरली असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पाळावीत

जीसटीच्या बाबतीत केंद्र सरकारने दिलेले आश्वासने पाळावीत असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. यासोबतच ’वन नेशन्स वन टॅक्स’ याबाबत विचार करावा. केंद्र सरकारने राज्याचे आतापर्यंत 30 ते 32 हजार कोटी रुपये दिले नाही. केंद्र सरकार दर महिन्याला यामध्ये कपात करतो. असा आरोपही अजित पवारांनी यावेळी केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!