टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा ’या’ कारणामुळे रद्द

मुंबई,

भारतीय क्रिकेट टीमचा आगामी न्यूझीलंड दौरा पुढील वर्षांपर्यंत स्थगित झाला आहे. आयसीसीच्या फ्यूचर टूर प्रोग-ामनुसार टीम इंडिया वर्ल्ड कप सुपर लीग अंतर्गत न्यूझीलंड विरुद्ध तीन सामने खेळणार होती. पण कोरोना महामारीमुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. आता टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप 2022 नंतरच न्यूझीलंडचा दौरा करणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्यानं देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑॅस्ट्रेलियामध्ये होणार्‍या टी20 वर्ल्ड कपनंतर ही सीरिज खेळली जाईल. न्यूझीलंडची टीम सध्या मर्यादीत ओव्हर्सचे क्रिकेट सामने खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौर्‍यावर आहे. त्यानंतर ते यूएईमध्ये टी20 वर्ल्ड कप खेळतील. हा वर्ल्ड कप संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडचे खेळाडू मायदेशी परतणार आहेत.

न्यूझीलंडची टीम टी20 वर्ल्ड कपनंतर दोन टेस्ट आणि तीन वन-डे मॅचच्या सीरिजसाठी भारताचा दौरा करणार आहे. त्यानंतर मायदेशी परतल्यानंतर बांगलादेश विरुद्ध दोन टेस्ट आणि तीन टी20 मॅचची सीरिज खेळेल. त्याचप्रमाणे त्यांची नेदरलँड विरुद्ध तीन वन-डे तसंच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन टेस्ट आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका देखील नियोजित आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!