राष्ट्रवादीबाबत केलेल्या ‘त्या’ खळबळजनक वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांचे स्पष्टीकरण

मुंबई,

माझे वक्तव्य व्यवस्थित ऐकले असते, तर त्याचा अर्थ कळला असता. पण हा वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार आहे, दुसरे काही नाही. कारण त्यांना अशा वक्तव्यांमुळेच थोडीफार प्रसिध्दी मिळते. त्यामुळे मला अशा वक्तव्यांना फार महत्त्व द्यावे असे वाटत नसल्याचा टोला लगावत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले आहे. येत्या 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग-ेसमध्ये लावणीस्र-ाज्ञी सुरेखा पुणेकर प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष असल्याचे वक्तव्य केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. याबाबत दरेकर यांनी आता स्पष्टीकरण देत टीका केली आहे.

प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीकडून तीव- प्रतिक्रिया आल्या. दरेकर यांच्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील अत्यंत कडक शब्दांत टीका केली होती. दरेकर त्यावर बोलताना म्हणाले की, कुणाच्या वक्तव्याला मी फारसे महत्व देत नाही. गाल सर्वांनाच रंगवता येतात. कुणीही अतिरेकी भाषा करु नये. हे योग्य नाही. ती केवळ मराठीतील एक म्हण आहे, असे सांगतानाच माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे स्पष्टीकरण देखील दरेकर यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे, आपले वक्तव्य नीट ऐकण्याचा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला आहे.

सर्वसामान्यांचा व तळा गाळ्यातील कार्यकर्त्यांचा भाजप हा पक्ष आहे. तर राष्ट्रवादी काँग-ेस पक्ष हा सुभेदारांचा, कारखानदारांचा, बँकावाल्यांचा, उद्योगपतींचा पक्ष असून अशाप्रकारे ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारे काही प्रवृत्तींचा पक्ष असल्याचे मी म्हणालो होतो. राष्ट्रवादी हा धनदांडग्यांना जवळ करणारा पक्ष असल्याचा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे महिलांबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य मी केले नाही व तसं बोलायचे कारणही नव्हते, तसा विषयही नव्हता. विरोधकांना माझे विधान नीट ऐकण्याची आवश्यकता असल्याचा टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!