भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 75 कोटी मात्रांचा टप्पा

मुंबई,

भारताने गेल्या 24 तासात 78,66,950 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 75.22 कोटीपेक्षा जास्त मात्रा (75,22,38,324) दिल्या आहेत. एकूण 76,12,687 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

गेल्या 24 तासात 37,127 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,24,84,159 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोनातून बरे होण्याचा दर 97.58म झाला आहे.

सलग 79 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 25,404 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,62,207 आहे. उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.09म आहेत.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 14,30,891 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 54.44 कोटीहून अधिक (54,44,44,967) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.07म असून गेले 81 दिवस 3म पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.78म. असून गेले 15 दिवस 3म पेक्षा कमी असून मागील 98 दिवस 5म पेक्षा कमी आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!