भावासोबत झालेल्या क्षुल्लक वादामुळे 16 वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल, उंदीर मारण्याचं औषध पिऊन संपवलं जीवन
मुंबई,
मुंबईत एका 16 वर्षीय मुलीनं भावासोबत झालेल्या क्षुल्लक वादानंतर धक्कादायक पाऊल उचललं आहे. तिनं थेट आपलं जीवन संपवलं आहे. कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 16 वर्षीय मुलीचा आपल्या भावासोबत मोबाईल गेम खेळण्यावरुन वाद झाला. त्यानंतर तिनं त्या रागात उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केली.
शुक्रवारी रात्री मृत मुलगी आणि तिच्या भावामध्ये मोबाईलवर गेम खेळण्यावरुन वाद झाला. त्यांच्याकडे एकच मोबाईल होता. भावानं मोबाईल न दिल्याचा राग मुलीला अनावर झाला. त्यानंतर तिनं रागात उंदीर मारण्याचं औषध प्यायलं. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र दुसर्या दिवशी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुलीचा मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मुलीचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला.
ही घटना शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली असून मृत मुलीचा तिच्या लहान भावासोबत मोबाईलवर गेम खेळण्यावरुन वाद झाला. या रागात मुलीनं जवळच असलेल्या मेडिकल स्टोअरमधून उंदीर मारण्याचं औषध आणलं. रागीट स्वभावाच्या असलेल्या या मुलीनं ते औषध आपल्या लहान भावासमोरचं प्यायली. तिनं औषध पिताच भावानं आपल्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितलं. त्यानंतर मुलीच्या आईवडिलांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती समता नगरचे पोलीस उपनिरीक्षक संतोष खराडे यांनी दिली आहे.