मोठ्या संस्था तसेच सरकारी आस्थापनांनी त्यांच्या कार्यासाठी शाश्वत ऊर्जा पद्धतींचा स्वीकार करावा :उपराष्ट्रपतींचे आवाहन
मुंबई,
उपराष्ट्रपती, श्री एम. वेंकैया नायडू यांनी मोठ्या आस्थापनांना आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना त्यांच्या कार्यपध्दतींमधून अक्षय ऊर्जास्त्रोतांचा वापर करून शाश्वततेवर अधिक भर द्यावा असे आवाहन केले. उद्योगांनी तसेच विद्यापीठे,सरकारी इमारती, आणि गोदामांसारख्या मोठ्या आस्थापनांनी आपल्या इमारतींच्या छतावर सौरऊर्जा संयंत्र बसवावे असा सल्लाही उपराष्ट्रपतींनी यावेळी दिला.
या संदर्भात, श्री नायडू यांनी सर्व राज्यांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या नवीन इमारतींसाठी आदर्श इमारतींसाठी केलेल्या नव्या अधिनियमांचा स्वीकार करण्याचा विचार करण्याचे आवाहन केले. पुरेसा प्रकाश आणि वायुविजन सुनिश्चित करण्याबरोबरच मोठ्या इमारती आणि सरकारी संस्थांनी, छतावरील सौर ऊर्जा संयंत्रे, सोलर वॉटर हीटर्स आणि पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर अनिवार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले.
पुडुचेरी येथील जेआयपीएमईआर(गखझचएठ), या संस्थेतील 1.5 मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौरऊर्जा संयंत्र राष्ट्राला समर्पित करताना श्री नायडू म्हणाले, की भारत ऊर्जा संक्रमण यासाठी जगाचे नेतेपद स्विकारण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. अलीकडेच भारतात स्थापित झालेल्या 100 गिगावँटच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या वैशिष्ट्यपूर्ण टप्प्याचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
भारताच्या ’ऊर्जा संक्रमणाची’ गतीमानता कायम राखण्यासाठी छतावरील सौर संयंत्रांचे महत्त्व अधोरेखित करताना, श्री नायडू यांनी निरीक्षण केले की छतावरील संयंत्रांसाठी इमारतींवरील रिकाम्या क्षेत्राचा वापर केला जातो, वापराच्या ठिकाणी ऊर्जा निर्माण केली जाऊन प्रसारणासाठी होणारे नुकसान कमी होते.