पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी ठाणे स्थानकाबाहेर अभाविपचे मूक आंदोलन
मुंबई,
साकीनाका परिसरात महिलेवर झालेल्या बलात्कार घटनेचा निषेधार्थ आज (रविवारी) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर मूक आंदोलन करण्यात आले आहे. तसेच पीडित महिलेला श्रद्धांजली अर्पित केली. पोलिसांनी या घटनेचा वेगाने तपास करून आरोपींना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेपर्यत पोहचवावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
अभाविप कोकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी सांगितले की, ’राज्यात महिलांवर अत्याचार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्य सरकार महिला सुरक्षेच्या विषयामध्ये अपयशी ठरले आहे. सध्या राज्याची कायदा व सुव्यवस्था अतिशय चिंताजनक असून साकीनाका येथे घडलेली घटना दिल्ली येथील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारी व सर्व मुंबईकरांसाठी लज्जास्पद तर आहेच त्याचसोबत समस्त महाराष्ट्राची मान शरमेने झुकवणारी आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसाांत तब्बल 4 बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. साकीनाका मुंबई येथे तर 34 वर्षीय महिलेवर क्रूर राक्षसी अत्याचार करत तिची निघृर्णपणे हत्या केल्याची भयानक घटना समोर आली आहे. अभाविप ठाणेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा ठाणे रेल्वे स्टेशन येथे तीव- निषेध येथे करत पीडित महिलेला श्रद्धांजली अर्पित केली.
एकूणच महिला सुरक्षितते बाबत राज्य शासनाने एकही शब्द बोलण्यास जागा ठेवली नाही. राज्य सरकारमधीलच कित्येक मंत्र्यांवर सुद्धा महिला अत्याचाराचे गंभीर आरोप आहेत. स्वत: चिडीचूप राहून झोपेचे सोंग घेणार्या महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ मूक आंदोलन करत आहोत, असे वक्तव्य ठाणे जिल्हा संयोजक रमाकांत मांडकुळकर यांनी केले. तसेच पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला वेग द्यावा व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी अभाविप कोकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी केली आहे.