आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीच पाचवी कसोटी रद्द, दिग्गज खेळाडूचा बीसीसीआयवर गंभीर आरोप

मुंबई,

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आणखी सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनाही कोरोनाचा कचाट्यात सापडले. त्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावरुन इंग्लंडच्या आजी माजी क्रिकेटपटूंकडून टीम इंडिया आणि बीसीसीआयवर टीका केली जात आहे.

या इंग्लिश क्रिकेटपटूचा बीसीसीआयवर आरोप

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना रद्द होणं याला कसोटी क्रिकेटच्या अंताची सुरुवात होणं असं म्हणू शकतो. आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसर्‍या टप्प्यातील उर्वरित सामन्यांसाठी हा सामना रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असं या माजी इंग्लिश क्रिकेटपटू स्टीव्ह हार्मिसनचं म्हणनं आहे. पाचवा कसोटी सुरु होण्याआधीच्या काही तासांपूर्वी हा सामना रद्द केला गेला.

ठहे बकवास आहे, हे वास्तववादी आहे. ही कसोटी क्रिकेटच्या समाप्तीची सुरुवात आहे. जेव्हा आपण हा असा मार्ग निवडता, तर बस झालं. याआधी आम्ही टीका करण्याची सुरुवात करु, निष्पक्ष राहू, इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेसोबत असं केलं. आम्ही यात पूर्णपणे निष्पाप नाही, कारण काय चालले आहे हे आम्हाला माहित नसताना आम्ही घरी आलो. पण हे सर्व आयपीएलमुळे घडलं‘, असं हार्मिसन म्हणाला.

ठआयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांना 5 दिवसांनी सुरुवात होणार आहे. पाचवा कसोटी सामन्याच्या तारखांमध्ये बदल करता येईल का ज्यामुळे आयपीएलसाठी सज्ज होता येईल, असं टीम इंडियाने इंग्लंड दौर्‍याआधी विचारलं होतं. हे सर्व मला योग्य वाटत नाही. मी मॅनचेस्टर कसोटीचं जे काही झालं, त्यासाठी मी दुखी आहे. मला इंग्लंडचे खेळाडू, समर्थक आणि कसोटी क्रिकेटबद्दल वाईट वाटतं‘, असंही हार्मिसनने नमूद केलं.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!