राज्यभरात गणरायाचं आगमन! कोविडच्या सावटाखाली अनेक ठिकाणी साधेपणाने उत्सव, लोकांचा उत्साह शिगेला
मुंबई,
भाद्रपद महिना लागला की सगळ्यांना चाहूल लागते ती लाडक्या बाप्पाची. बाप्पाच्या आगमनासाठी सगळे सज्ज होतं असतात. मात्र, यंदाच्या वर्षीही कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. नागरिकही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहेत. दुसरीकडे यंदाच्या वर्षी अतिवृष्टीचा मोठा फटका राज्याला बसला आहे. याच आठवड्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशी परिस्थिती असली तरी राज्यभरात गणरायाचं आगमन उत्साहाच होत आहे.
कोकणात गणेशोत्सावाची धामधूम
एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे गणपती बाप्पाचे आगमन. कोकणातला गणेशोत्सव म्हटलं तर धूमधडाक्यात नेहमीच साजरा होत असतो. पण गेली दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यात शासनाने लादलेले निर्बंध यामुळे गेले दोन वर्ष गणेश उत्सव कोकणकरांना साजरा करता आला नाही. पण या वर्षी शासनाने निर्बंधात सूट दिली असल्याकारणाने हजारो चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी दाखल झालेले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाला डोक्यावरून घरी आणण्याची परंपरा आजही कोकणकरांनी कायम राखलेली आहे. कोरोनाचे सर्व नियम नियम पाळून कोकणात गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जातोय. वर्षभर बंद असलेली घरे या गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी दोन दिवस अगोदर येऊन आपल्या घराची साफसफाई करून आपला लाडका बाप्पा घरात येणार यासाठी सजावट करतो आणि याच बापाचं आज प्रत्येकाच्या घरोघरी आगमन झालेलं आहे.
कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सवाला आजपासून सुरवात झाली आहे. तळकोकणात 68313 गणेश मूर्तीची घरोघरी प्रतिष्ठापना होणार आहे. जिल्ह्यातील ग-ामीण भागात डोक्यावरून पारंपरिक पद्धतीने गणरायाच आगमन झालं तर काही कालावल खाडीतून बोटीतून गणेशभक्त लाडक्या बाप्पाला घेऊन जात आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा व महसूल विभाग सज्ज आहे. सिंधुदुर्गात 32 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. बाजारपेठा सजल्या आहेत.
पुणेकरही उत्साहात..
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मानाचे गणपती मंडळानी हा आनंदाचा उत्सव मागील वर्षाप्रमाणे साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मानाचे पाचही गणपतीची तसेच प्रमुख गणपती प्राणप्रतिष्ठापना उद्या दुपारपर्यंत होणार आहे. कोरोनामुळे प्रतिष्ठापनेआधी मिरवणुका निघणार नाहीत. सर्व गणपतीचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून भक्तांना घेता येणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवाच्या मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मराठीत टिवट करत देशवासियांना गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी केलेल्या टवीटमध्ये म्हटलं आहे की, आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!ङ्ग
राजकारणी, सेलिब-ीटींच्या घरीही बाप्पा..
राज्यातील बहुतेक राजकारणी मंडळीच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रत्येक पक्षाच्या नेत्याच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. चित्रपट, क्रिडी, उद्योग अशा सेलिब-ीटींच्या घरीही गणोशोत्सव साजरा केला जातो. आपल्या बाप्पाचे फोटो हे सेलिब-ीटी आपल्या चाहत्यांसोबत साजरे करत असतात.