न्यूज ऑॅन एअर थेट प्रसारणसेवांचा अनुक्रम
मुंबई,
न्यूज ऑॅन एअर अॅप यावरून होणार्या रेडिओ प्रसारणाला रोजगारक्षम वयोगटातील बहुसंख्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई व कोची सारख्या शहरातील रेडिओ प्रसारण ऐकणार्यांपैकी 75 टक्के लोकसंख्या 25 ते 64 वयोगटातील आहे. निवडक महानगरांमधून न्यूज ऑॅन एअर या अॅपचे वापराच्या लोकसंख्येनुसार केलेल्या मापनावरून हे निष्कर्ष मिळाले आहेत.
न्यूज ऑॅन एअर अॅप वरून होणार्या थेट रेडिओ प्रसारणाच्या भारतातील प्रमुख शहरांमधील लोकप्रियतेचे मोजमाप करून त्याप्रमाणे शहरांची यादी तयार केली असता त्यामध्ये चेन्नई व अहमदाबाद वरच्या स्थानी आले आहेत तर दिल्ली व जयपूरचा क्रमांक घसरला आहे.
भारतातील सर्वात प्रमुख एअर प्रसारण सेवांच्या क्रमवारीत रेनबो कन्नड कामनबिल्लु हे दोन पायर्यांनी वर गेले आहेत तर अस्मिता मुंबई तसेच एफएम गोल्ड दिल्ली या प्रसारणसेवांची क्रमवारीत घसरण झाली आहे.
240 पैकी जास्त रेडिओ प्रसारण सेवांचे न्यूज ऑॅन एअर या प्रसारभारतीच्या अधिकृत अपवरून थेट प्रसारण होते. या न्यूज ऑॅन एअर अॅपवरील ऑॅल इंडिया रेडिओ प्रसारणाला भारतात तर मोठा श्रोतृवर्ग आहेच पण जगभरातील 85पेक्षा अधिक देश आणि 8000 शहरातून मोठ्या संख्येने हे प्रसारण ऐकले जाते.
न्यूज ऑॅन एअर अॅपवरून होणार्या ऑॅल इंडिया रेडिओ थेट प्रसारणसेवा सर्वात लोकप्रिय असणारी भारतातील प्रमुख शहरे पुढील कोष्टकात आहेत. न्यूज ऑॅन एअर अपवरून होणार्या ऑॅल इंडिया रेडिओ थेट प्रसारणसेवांच्या लोकप्रियतेचा अनुक्रम आणि त्याचे शहरानुसार वर्गीकरणही तेथे मिळेल. हे अनुक्रम 16 ऑॅगस्ट ते 31 ऑॅगस्ट या पंधरवड्यात जमवलेल्या माहितीवर आधारित आहेत.