चिपी विमानतळ उद्घाटनाला मुख्यमंत्री आले तर आम्ही प्रोटोकॉलप्रमाणे मान देऊ – नारायण राणे

मुंबई,

कोकणातील चिपी विमानतळाचे उद्घाटन 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. या विमानतळाच्या श्रेयावरुन राजकीय वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे. तसेच उद्घाटनाला कोण उपस्थित राहणार यावरुनही चर्चा रंगल्या आहेत. उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन होईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं, विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आले तर आम्ही प्रोटोकॉलनुसार मान देऊ.

काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, मी ज्योतिरादित्य सिंधियांना भेटलो आणि विमानतळ उद्घाटनाचा वेळ घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलावणार का? यावर राणेंनी म्हटलं होतं, मुख्यमंत्री पाहिजेत असं नाही.

भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं होतं, विमानतळाचं उद्घाटन होणार आहे, चालत्या गाडीत शिरण्याचा प्रयत्न म्हणजे विनायक राऊत आहेत. चालत्या गाडीत शिरल्याने श्रेय मिळत नाही. जर तुमचं श्रेय होतं तर गेल्या 15 वर्षांत विमानतळाचं उद्घाटन का नाही झालं. जर तुमची मेहनत होती तर गेली दोन वर्षे तुम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून का बसला होतात. राणेंचा पाठपुरवठा आणि भाजप याआधारावर कोकणवासीयांना ही सेवा मिळणार आहे.

कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. 9 ऑॅक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन होईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.

सुभाष देसाई यांनी सांगितले, उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) हा प्रकल्प हाती घेऊन आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करून या विमानतळाचे काम पूर्ण केले आहे. एकूण 286 हेक्टर जमिन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. यासाठी सुमारे 520 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यात आय आर बी, सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. यांना विमानतळ उभारणी, फायनान्स तसेच ऑॅपरेशन्स (ँइध्) साठी भाडेतत्वावर (लीजवर) हे काम देण्यात आले आहे. विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी लागणार्‍या पाण्याचा पुरवठा, रस्ते विकास, संरक्षण भींत या सारखी कामे एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. यासाठी एमआयडीसीने 14 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!