सत्या चित्रपटातील डायलॉग शेअर करत नितेश राणे यांनी विरोधकांना दिला इशारा

मुंबई,

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात ‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटिस जारी करण्यात आली. पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस कंपनीकडून घेतलेले 65 कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पाठवली आहे. ही तक्रार दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने नोंदवली होती. 25 कोटींचे कर्ज आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने घेतले होते. तर आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नीलम राणे या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, यावर नितेश राणे यांनी सत्या चित्रपटातील डायलॉग शेअर करत टिवटरच्या माध्यमातून विरोधकांना इशारा दिला आहे.

काल याप्रकरणी नितेश राणे यांनी थेट ठाकरे सरकारला देखील इशारा दिला होता. हे सर्क्यूलर कुणी काढले असेल, यावर बोलतांना नितेश राणे म्हणाले, सर्क्यूलर कुणी काढले हे ठाकरे सरकारला विचारा. आम्ही यांची झोप उडवत आहोत. आता यांचे सगळे भ-ष्टाचाराचे विषय बाहेर निघणार असल्यामुळे अडचणी आमच्या वाढणार की ठाकरे सरकारच्या वाढणार हे तुम्हाला येणार्‍या दिवसात कळेल. तसेच लुकआउट नोटिस संदर्भात आम्ही उच्च न्यायालयात बोलू, या गोष्टींशी आमचा सबंध नाही.

दरम्यान बदनामीच्या खटल्यासाठी तयार राहा असे, आव्हान देखील नितेश राणे यांनी आज दिले आहे. बदनामीच्या खटल्यासाठी तयार राहा कारण हे लुकआउट परिपत्रक आहे, नोटीस नाही! न्यायालयात भेटू माझ्या मित्रांनो, असे टिवट देखील राणे यांनी केली आहे.

तसेच त्यांनी सर्क्यूलर आम्हाला नाही तर विमानतळ प्राधिकरणाला पाठवली आहे. त्यामुळे आम्हाला प्रवास करता येणार की नाही हे त्यांना ठरवावे लागणार आहे. आम्ही महाराष्ट्र सोडून जाणार नाही. ठाकरे सरकार महाराष्ट्र बुडवायला निघाले आहे. वर्षानुवर्षे कर भरुन, अधिकृत व्यवसाय करुन आम्ही राजकारण करतो. यांच्यासारखे काळे धंदे आम्ही करत नाही. असे म्हणत नितेश राणे यांनी नितेश राणे एबीपी माझासोबत बोलताना काल ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.

नितेश राणे म्हणाले, पुणे पोलिसांनी हे सर्क्यूलर काढले आहे. पण मुंबई ब-ांचमध्ये आमचे डीएचएफएलचे खाते असल्यामुळे पुणे क्राईम ब-ांचला हा अधिकार कसा?, तसेच आम्ही 5 महिन्यापुर्वी सबंधित बँकेला आम्हाला लोन सेटल करायचे असल्याचे अधिकृत पत्र दिलेले आहे. त्यामुळे अशा नोटिसीचा उपयोग नाही. या प्रकराणात आम्ही उच्च न्यायालयात जाऊन आव्हान देणार आहोत. नारायण राणेंच्या कुटुंबाच्या अडचणी नाही, तर आता क्राईम ब-ांचची अडचण होणार, महाविकास आघाडीची अडचण होणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!