…म्हणून लालबागचा राजा प्रतिष्ठापणेस विलंब
मुंबई,
लालबागच्या राज्याच्या प्रतिष्ठापणा पूजेस विलंब होत आहे. कारण, लालबागच्या राजाची स्थापना करणार्या स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांना पोलिसांनी नोटीस पाठवून त्यांची दुकानं बंद केली आहेत. त्यामुळे लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी प्रचंड नाराज आहेत. दरम्यान, मुंबई पोलिस आणि लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांच्यात गेल्या तासाभरापासून चर्चा सुरू आहे.
तसेच, लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनालाही पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे बाहेरून कोणी भावीक लालबागमध्ये येणार नाहीत. मग स्थानिक रहिवाशांची दुकानं का बंद करण्यात आली? असा प्रश्न लालबाग मार्केटमधील रहिवाशी विचारत आहेत. शिवाय, स्थानिकांना त्यांच्याच घरी येण्या-जाण्यासाठी पोलिसांकडून अटकाव करण्यात येत आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळही स्थानिक रहिवाशांच्या मागणीवर ठाम राहिले आहे. ते पोलिसांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे लालबागचा राजाच्या प्राणप्रतिष्ठापणेस विलंब होत आहे.